🔥 ट्रेंडिंग विजय देवराकोंडा की पैन-इंडिया फिल्म 'र... नानी का 'जेलर 2' जारी हुआ आधिकारिक तेल... इन्फ्लुएंसर ने काइंची धाम के आगंतुकों... उत्तराखंड के जंगलों को बचाया, 3.96 लाख... भारत‑यूएई ने ऊत्तराखंड में माउंटेन गार... चत्तीसगढ़ में युवा आशावादी पर अम्ल हमल...
05 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
नवरात्रोत्सवाच्या खर्चात बचत करत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ₹१६ लाखांची मदत जाहीर; कपिल पाटील फाउंडेशन आणि लोढा अपर ठाणे रहिवासी संघाचा स्तुत्य उपक्रम.
राजनीति

नवरात्रोत्सवाच्या खर्चात बचत करत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ₹१६ लाखांची मदत जाहीर; कपिल पाटील फाउंडेशन आणि लोढा अपर ठाणे रहिवासी संघाचा स्तुत्य उपक्रम.

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 05 अक्टू. 2026, 08:08 PM 👁 10
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
२४ न्यूज (24News) – विशेष वृत्त
ठाणे जिल्हा विशेष वृत्त
नवरात्रोत्सवाच्या खर्चात बचत करत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ₹१६ लाखांची मदत जाहीर; कपिल पाटील फाउंडेशन आणि लोढा अपर ठाणे रहिवासी संघाचा स्तुत्य उपक्रम
• जिल्हा रिपोर्टर: काशिनाथ देसले, ठाणे
• तालुका रिपोर्टर: किशोर पवार, मुरबाड
• दिनांक: ६ ऑक्टोबर २०२६
ठाणे/मुरबाड:
उत्सवाचा आनंद साजरा करतानाच सामाजिक भान जपण्याचं एक आदर्श उदाहरण ठाणे जिल्ह्यात समोर आलं आहे. कपिल पाटील फाउंडेशन आणि लोढा अपर ठाणे रहिवासी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांसाठी एकूण ₹१६ लाखांची भरीव मदत जाहीर करण्यात आली आहे.
यंदाच्या नवरात्रोत्सवामध्ये होणाऱ्या विविध खर्चात बचत करून हा निधी थेट अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय दोन्ही संस्थांनी घेतला आहे.
मदतीचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:
• कपिल पाटील फाउंडेशनतर्फे: ₹११ लाख
• लोढा अपर ठाणे रहिवासी संघातर्फे: ₹५ लाख
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या आपल्या अन्नदात्या शेतकरी बांधवांच्या अडचणींमध्ये सहभागी होणे, त्यांना या संकटसमयी भक्कम आधार देणे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडणे, हाच या विशेष उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. सणांचा अनावश्यक खर्च टाळून थेट मदतीचा हात पुढे करणाऱ्या या उपक्रमाचे ठाणे जिल्हा आणि विशेषतः मुरबाड परिसरातून प्रचंड कौतुक होत आहे
📲Get App