🔥 ट्रेंडिंग बच्चों ने रावण दहन के कार्यक्रम का सफल... Dakshina Kannada, Udupi Districts Gear... Karnataka Youth Scientists Honored wit... आईएएफ के प्रमुख एपी सिंह ने पहली प्रशि... Bangalore Metro Enhances Digital Card... अदिति भंडारकर ने डीपी वर्ल्ड पीजीटी क्...
22 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
सरकारी योजना

नंदुरबार जिल्ह्यात महसूल विभागाच्या कामकाजाच्या आढावा

✍️ रिपोर्टर: Ashok Patil 🗓 22 अक्टू. 2026, 02:41 PM 👁 63
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नंदुरबार जिल्ह्याच्या महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा

नंदुरबार जिल्ह्यात महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा; महसूल वसुली वाढविण्यासह प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे महसूल विभागाच्या कामकाजाचा व गौण खनिज विषयक प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जमीन महसूल व गौण खनिज वसुली, प्रलंबित फेरफार नोंदी, खरीप हंगाम सर्वेक्षण, ॲग्रीस्टॅक योजना आणि अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यात महसूल व गौण खनिज वसुलीचे उद्दिष्ट नुसार करण्यात येत आहे. तसेच १,७४८ फेरफार नोंदी प्रलंबित असून, खरीप हंगामातील ८४.४० टक्के भूखंडांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत ८८.६७ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. अवैध उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण, प्रलंबित दंडवसुली, जमीन विक्री परवानगीची प्रकरणे आणि गौण खनिज विषयक तक्रारींचे नियमानुसार निराकरण करण्यावर भर देण्यात आला.

सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी प्रलंबित कामांचा नियमित आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी आणि अद्ययावत अहवाल सादर करावा, असे बैठकीत स्पष्ट सूचना देण्यात आल्या
📲Get App