🔥 TRENDING পুরুলিয়ার বেলডি ব্রিজে নদী থেকে স্বয়... ਬਠਿੰਡਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ਪਲਸ ਪੋਲੀਓ ਮੁਹਿੰਮ ਦ... Pregnant Minor’s Complaint Sparks Arre... Kerala Teen Suffers Kidney Damage Afte... Kerala Sets Up Expert Panel to Bridge... Shashi Tharoor Calls for End to Kerala...
24 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

नांदेडमध्ये पाण्याच्या टाकी बांधकामात शेख अन्सार यांचा दुर्दैवी मृत्यू: कुटुंबाला न्यायाची मागणी

✍️ Reporter: G. P. G. U. .7798377959 🗓 24 Nov 2026, 05:52 PM 👁 20
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नांदेडच्या चौफाळा परिसरात पाण्याच्या टाकीच्या बांधकामादरम्यान शेख अन्सार (वय 48) यांचा उंचीवरून पडून मृत्यू झाला. कुटुंबाला न्याय आणि आर्थिक मदतीची मागणी करत आझाद समाज पार्टीचे किरण सदावर्ते यांनी सांत्वन दिले.

नांदेड शहरातील चौफाळा परिसरात महानगरपालिकेच्या नवीन पाण्याच्या टाकीच्या बांधकामादरम्यान उंचीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेख अन्सार (वय अंदाजे 48 वर्षे, रा. परभणी) यांच्या कुटुंबीयांची आज भेट घेऊन सांत्वन करण्यात आले.

यावेळी आझाद समाज पार्टी (कांशीराम) चे नांदेड जिल्हाध्यक्ष किरण भास्कर सदावर्ते आणि ANI चे पत्रकार शेख मेहबूब यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे दुःख जाणून घेतले व त्यांना धीर दिला.

सदर घटनेमध्ये कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध होती का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या घटनेसंदर्भात घटनास्थळाचा मूळ व्हिडिओ तसेच मृत मजुरासोबत काम करणाऱ्या सहकारी कामगारांचे बाईट उपलब्ध असल्याचे किरण सदावर्ते यांनी सांगितले.

मृत शेख अन्सार यांच्या कुटुंबाला महानगरपालिकेने 25 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, कुटुंबातील एका पात्र सदस्याला नोकरी द्यावी, लागू विमा संरक्षण व कायदेशीर नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करावे, त्याचा परवाना नियमानुसार निलंबित किंवा रद्द करावा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरही कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

"एका गरीब मजुराचा जीव स्वस्त नाही! शेख अन्सार यांच्या कुटुंबाला न्याय आणि आर्थिक आधार मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करू," असा निर्धार किरण भास्कर सदावर्ते यांनी व्यक्त केला.
📲Get App