🔥 TRENDING परीक्षा और बारिश के कारण रायबरेली-कानप... Kya prayagraj khatre me hai राजू भाई को मिली बेटी की सौगात વેજલપુર (અમદાવાદ)ના જલીયાણા સત્સંગ મંડ... राहुल गांधी और महेश भाईया एक साथ आए Kalpa Sees 8.5°C Drop in Temperature,...
30 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

नाशिक येवला परिसरातील आश्रमात महिलेवर लैंगिक अत्याचार; फरार भोंदूबाबा उमाकांत खंडेश्वर महाराज अटक

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 30 Oct 2026, 11:51 AM 👁 23
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नाशिक जिल्ह्यातील दत्तवाडी येथील आश्रमात धार्मिक विधीच्या बहाण्याने महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या उमाकांत खंडेश्वर महाराज यांना पोलिसांनी दिंडोरी परिसरातून अटक केली आहे. या प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यात धार्मिक विधी आणि भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या घटनांचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. येवला तालुक्यातील दत्तवाडी येथील एका आश्रमात महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या उमाकांत खंडेश्वर महाराज या भोंदूबाबाला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच नाशिक शहरात अशोक खरात नामक भोंदूबाबाने धार्मिक विधीच्या बहाण्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आणि त्याचे चित्रीकरण समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. हे प्रकरण ताजे असतानाच दत्तवाडी येथील आश्रमात घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे पुन्हा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित महिला धार्मिक विधी करण्यासाठी दत्तवाडी येथील आश्रमात गेली होती. मात्र, आरोपी उमाकांत खंडेश्वर याने तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत सुरुवातीला तिचा विनयभंग केला व त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित महिलेने हिंमत दाखवून पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी महाराज आश्रमातून पसार झाला होता आणि पोलिसांना सतत गुंगारा देत होता.

अखेर दिंडोरी परिसरातून त्याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रथम तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी दिली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
📲Get App