🔥 TRENDING Police Station Rape Case: 9 More Offic... New Web Series to Debut on OTT Platfor... Actress Aksha Pardasany and Husband Ka... Akshay Kumar and Saif Ali Khan’s Thril... Official teaser of "Swag Raja" unveile... 'State of Fear' Film Trailer Released...
02 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

मावळात दुचाकी चोराट्याला नागरीकांनी रंगेहाथ पकडले टोळीचा पर्दाफास् होण्याची शक्यता

✍️ Reporter: सतिश हजारे 🗓 02 Nov 2026, 02:23 AM 👁 27
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मावळातील दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता! नागरिकांनीच एका चोरट्याला रंगेहात पकडले; १२ ते १५ दुचाकी चोरी केल्याची प्राथमिक माहिती!
कामशेतमधील दर्शन ढाब्याजवळ दुचाकी चोरी करताना संशयिताला नागरिकांनी पकडले; कामशेत पोलिसांच्या स्वाधीन, चोरीच्या आणखी घटनांचा उलगडा होण्याची शक्यता!
मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पवनानगर, मळवली, नाणेगाव, लोणावळा आणि कामशेत परिसरातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. या वाढत्या घटनांमुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
दरम्यान, कामशेत येथील दर्शन ढाब्या जवळ दुचाकी चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका संशयिताला स्थानिक नागरिकांनी सतर्कता दाखवत रंगेहात पकडले. नागरिकांनी त्याला ताब्यात घेत कामशेत पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे मावळ तालुक्यातील दुचाकी चोरीच्या अनेक घटनांचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पकडलेल्या संशयिताने तब्बल १२ ते १५ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
कामशेत पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याने नेमक्या किती दुचाकी चोरल्या, कोणकोणत्या भागांतून चोरी केली, चोरीच्या दुचाकी कुठे विकल्या किंवा कोणाकडे सुपूर्द केल्या, तसेच या चोरीच्या घटनांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
या संशयिताच्या चौकशीतून पवनानगर, मळवली, नाणेगाव, लोणावळा आणि कामशेत परिसरातील दुचाकी चोरीच्या अनेक घटनांचा छडा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता कामशेत पोलिसांच्या तपासाकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.
नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे दुचाकी चोरीच्या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले असून, पोलिसांच्या पुढील तपासातून आणखी किती चोरीच्या घटनांचा पर्दाफाश होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
📲Get App