🔥 TRENDING Jharkhand Daily News Update Uploaded o... Jharkhand TET 2026 Admit Cards to Be R... Kerala Karunya Plus KN-645 Lottery Res... Northeast Monsoon Expected to Commence... Smriti Irani Responds to Opposition Cr... પ્રાંતિજ પોલીસે વાહન ચોરીના બે ગુનાનો...
16 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मतदार यादीतील दावे-हरकतींसाठी मुदतवाढ; अंतिम यादी १६ नोव्हेंबरला
Politics

मतदार यादीतील दावे-हरकतींसाठी मुदतवाढ; अंतिम यादी १६ नोव्हेंबरला

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 15 Oct 2026, 10:54 PM 👁 19
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीतील दावे व हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता २६ ऑक्टोबरपर्यंत नागरिक या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील, तर अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी १२ ऑक्टोबरपर्यंत असलेली मुदत आता २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असून, पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले आहे.

निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर रोजीच प्रसिद्ध केली जाणार आहे.

दरम्यान, प्रारूप मतदार यादीतील नोंदींची जुळवणी न झालेल्या किंवा नोंदींमध्ये विसंगती आढळलेल्या मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १३ कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य वैध कागदपत्रे सादर करण्यासाठी ‘बीएलओ ॲप’मध्ये ‘Any Other Documents’ हा नवीन पर्याय देण्यात आला आहे.

मतदारांनी यादीतील आपले नाव, पत्ता, वय व जन्मतारीख यांची पडताळणी करून आवश्यक दुरुस्तीसाठी अर्ज करावेत. तसेच नवमतदार आणि यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी नोंदणी करून घ्यावी. यासाठी निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा संकेतस्थळाचा किंवा ‘ECINet’ मोबाईल ॲपचा वापर करता येणार आहे. ऑफलाईन अर्जासाठी तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
📲Get App