🔥 TRENDING Karnataka HC grants lenient sentence t... Raichur schools forced to hold classes... Karnataka HC Upholds ED Seizure of Gen... Delhi Expect Cloudy Skies as Monsoon B... Rajasthan Civic Body Elections Near as... Rain Expected in Kota Division Over Ne...
19 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

मिशन फिनिक्स: रत्नागिरी पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात १६ गुन्हे दाखल, २२ जणांना अटक

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 19 Sep 2026, 10:36 AM 👁 21
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रत्नागिरी जिल्ह्यात ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत राबवलेल्या विशेष मोहिमेत १६ गुन्हे दाखल, २२ संशयितांना अटक, २ लाख रुपये किमतीचे नशिल्या पदार्थ जप्त.

रत्नागिरी जिल्ह्यात ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत राबवलेल्या विशेष मोहिमेत ८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ठाण्यांमध्ये कारवाई करण्यात आली. या मोहिमेत अमली पदार्थांच्या बेकायदेशीर विक्री, साठवणूक व सेवन करणाऱ्या घटकांविरुद्ध १६ गुन्हे दाखल करण्यात आले व २२ संशयितांना अटक करण्यात आली.

या कारवाईदरम्यान १० गुन्हे अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध व ६ गुन्हे पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी नोंदवण्यात आले. संयुक्त छाप्यांमध्ये ७७ हजार रुपये किमतीचे ५.१५ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन व १ लाख २५ हजार २०० रुपये किमतीचा २.५११ किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला, ज्याची एकूण किंमत २ लाख २ हजार २०० रुपये होती.

‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत केवळ प्रतिबंधात्मक कारवाया नव्हे तर जनजागृती उपक्रमही राबवण्यात आले आहेत, ज्यामुळे तरुण पिढीला व समाजाला अमली पदार्थांच्या घातक विळख्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे.

जिल्हा पोलीस दलाने पुढील काळातही अशीच कठोर व सातत्यपूर्ण कारवाई सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून नागरिकांना कोणत्याही अमली पदार्थांच्या विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा सेवनाबाबत माहिती असल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा ‘रत्नसेतू चॅटबॉट’ (९३७१४१५६१२) वर गोपनीय माहिती द्यावी असा आवाहन करण्यात आले आहे.
📲Get App