🔥 TRENDING রেজিনগর বিধানসভার বেলডাঙা থানার অন্তর্... રાપર તાલુકામાં 18 સપ્ટેમ્બરનો ભારે વરસ... વાગરા: પહાજ હત્યાકાંડમાં પોલીસે કબ્જો... मुंबई–गोवा महामार्गावरील खारपाडा टोल ब... मुंबई–गोवा महामार्गावरील खारपाडा टोल ब... सासाराम मंडल कारा में बंदकैदी कि हुई म...
15 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

मुरबाडचे ज्येष्ठ काँग्रेस नेते व कुणबी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष जयराम (आप्पा) पडवळ यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८८वर्ष्याने निधन.

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 15 Sep 2026, 10:15 PM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
Need 24 न्युज विशेष वृत्त :मुरबाडचे ज्येष्ठ काँग्रेस नेते व कुणबी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष जयराम (आप्पा) पडवळ यांचे वृद्धापकाळाने निधनठाणे/मुरबाड:मुरबाड तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी तालुकाध्यक्ष तथा कुणबी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष कै. जयराम (आप्पा) पडवळ यांचेp वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. रविवार, दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांनी मुरबाड येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने मुरबाड तालुक्यासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.एक निष्ठावान आणि जेष्ठ नेतृत्व हरपले:जयराम (आप्पा) पडवळ यांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पदावरून निवृत्त झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून दीर्घकाळ कार्य केले. तालुकाध्यक्ष पदावर कार्यरत असताना त्यांनी पक्ष संघटना ग्रामीण भागात तळागाळापर्यंत मजबूत केली. साधी राहणी, स्पष्टवक्तेपणा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेली नाळ यांमुळे ते लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते.कुणबी समाजाच्या न्यायासाठी संघर्ष:कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष असताना त्यांनी समाजातील तरुण पिढीला एकत्र आणून शिक्षण, आरक्षण आणि सामाजिक न्यायासाठी मोठा लढा दिला. त्यांच्या या मोलाच्या कार्यामुळेच आज मुरबाड तालुक्यात कुणबी समाज संघटित आणि भक्कम स्थितीत उभा राहिला आहे. त्यांच्या पश्चात चार मुली, पुतणे व पडवळ कुटुंबाचा मोठा परिवार आहे.सर्वपक्षीय नेत्यांकडून शोकभावना:आप्पांच्या निधनाची वार्ता समजताच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कुणबी समाजाचे बांधव, तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेऊन दर्शन घेतले. "आप्पांच्या रूपाने आम्ही एक प्रामाणिक, लढवय्ये आणि मार्गदर्शक नेतृत्व गमावले आहे," अशा शब्दांत उपस्थित सर्व समाज बांधवांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.२३ सप्टेंबरला उत्तरकार्य विधी:कै. जयराम (आप्पा) पडवळ यांचा शेवटचा उत्तरकार्य विधी बुधवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी मुरबाड येथील कुणबी समाज भवन येथे संपन्न होणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.जिल्हा सिटी रिपोर्टर: काशिनाथ देसले, ठाणेतालुका सिटीझन रिपोर्टर: किशोर पवार, मुरबाडदिनांक: १५/०९/२०२६विशेष वृत्त: Need 24न्युज.
📲Get App