जीवनशैली
मुरबाड येथे भाजप अनुसूचित जमाती मोर्चाची पत्रकार परिषद; मोरोशी येथे ‘जनजातीय गौरव सप्ताहा’निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक १५/११/२०२६.
मुरबाड (प्रतिनिधी - नीड २४ न्यूजमहाराष्ट्र )
क्रांतिसूर्य आणि थोर स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त (१५ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्ष, ठाणे जिल्हा ग्रामीण अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात 'जनजातीय गौरव सप्ताह' साजरा करण्यात येत आहे. ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहाची सविस्तर माहिती देण्यासाठी मुरबाड येथे नुकतीच एक विशेष पत्रकार परिषद पार पडली. या सप्ताहानिमित्त मोरोशी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या पत्रकार परिषदेच्या व्यासपीठावर भाजप ठाणे जिल्हा ग्रामीण अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष श्री. गोविंद भला, कमलू खाकर, श्री. उघडा आणि माजी सभापती दिपकजी पवार यांच्यासह पक्षाचे अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष श्री. गोविंद भला आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.
या सप्ताहाअंतर्गत मोरोशी येथे ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, अभिवादन आणि प्रबोधनपर सत्रांचे आयोजन होणार आहे. यासोबतच परिसरातील आदिवासी पाड्यांवर आणि गावांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे आणि सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या आदिवासी कल्याणाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
मोरोशी येथे होणाऱ्या या सप्ताह कार्यक्रमांना आदिवासी बांधवांसह सर्वच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष गोविंद भला, माजी सभापती दिपकजी पवार आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेत केले.