मुरबाड विधानसभा मतदार यादीतून १ लाख ३४ हजार नावे वगळली
यहाँ देखें:
▶️ YouTube
नीड २४न्युज, जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे. तालुका रिपोर्टर किशोर पवार.मुरबाड विधानसभा मतदार यादीतून १ लाख ३४ हजार नावे वगळली
मुरबाड (बातमीदार) : मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर तब्बल १ लाख ३४ हजार ४०६ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण २७.३२ टक्के असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
मतदार यादीच्या पुनरीक्षणापूर्वी मुरबाड विधानसभा मतदारसंघात चार लाखांहून अधिक मतदारांची नोंद होती. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत ३ लाख ५७ हजार ५७४ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी मुरबाड विधानसभा मतदारसंघाची विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ अंतर्गत नवी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आल्याने मतदारसंघातील मतदारसंख्येत लक्षणीय बदल झाला आहे.
नागरिकांनी नव्या मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. चुकीने नाव वगळले असल्यास संबंधित प्रक्रियेद्वारे दावा अथवा हरकत नोंदवता येणार आहे. दिनांक १९/०९/२०२६.