🔥 TRENDING સુરતમાં મેડિકલ સ્ટોર પર દરોડો: પશુઓની... Ujiyarpur mein rail ki rukne ki mang k... > जिला परिषद चुनाव में भाजपा का खुला ख... અમરેલીમાં ગેરકાયદે દબાણો સામે બુલડોઝર... ग्राम तिन्दौनिया में बंसकार परिवार द्व... शहडोल में खाकी का बड़ा प्रहार: जयसिंहन...
14 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मुरबाड तालुक्यातील पावसाअभावी भातशेती संकटात; नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची लोकमित्र रमेश हिंदुराव यांची मागणी
Agriculture

मुरबाड तालुक्यातील पावसाअभावी भातशेती संकटात; नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची लोकमित्र रमेश हिंदुराव यांची मागणी

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 14 Oct 2026, 08:47 PM 👁 9
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुरबाड तालुक्यातील पावसाअभावी भातशेती संकटात; नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची लोकमित्र रमेश हिंदुराव यांची मागणी
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक १५/१०/२०२६.
विशेष वृत्त मुरबाड ठाणे.
चालू हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे मुरबाड तालुक्यातील भातशेती पूर्णपणे संकटात सापडली आहे. महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेली उभी पिके डोळ्यांदेखत करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, नुकसानग्रस्त पिकांचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी आग्रही मागणी लोकमित्र रमेश यशवंत हिंदुराव यांनी मुरबाडच्या तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, मुरबाड तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत अल्प राहिले आहे. सुमारे महिनाभर पावसाचा पत्ता नसल्याने भात पिकांवर याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे. शेतातील पिके सुकू लागल्याने तालुक्यातील बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर करताना ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना वगळले असले, तरी प्रत्यक्षात येथील परिस्थिती गंभीर असल्याचे हिंदुराव यांनी निवेदनात नमूद केले आहे.
तातडीने पाहणी व पंचनामे करण्याची मागणी
संबंधित महसूल व कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करावी आणि त्यांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाचा कारभार गतीमान व्हावा यासाठी गावातील बाधित शेतकऱ्यांची नावे आणि पिकांच्या नुकसानीची छायाचित्रेही निवेदनासोबत जोडण्यात आली आहेत.
कसेल त्याची जमीन: कसतदारांनाही मदत मिळण्याची अपेक्षा
अनेक शेतकरी स्वतःची शेती करतात, तर काही जण इतरांकडून जमीन घेऊन ती कसतात. पावसाअभावी झालेल्या या नुकसानीचा फटका जमीन मालकांसोबतच रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या कसतदार शेतकऱ्यांनाही बसला आहे. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार कोणताही पात्र लाभार्थी या मदतीपासून वंचित राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
पावसाअभावी झालेल्या नुकसानीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे वेळेत पाठवल्यास बाधित शेतकऱ्यांना शासकीय नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तालुक्यातील हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी आर्त हाक या निवेदनातून देण्यात आली आहे.
"शेतकरी वाचला तरच देश वाचेल..."
📲Get App