🔥 ट्रेंडिंग Mathura कोसीकला पुलिस ने टैक्टर से हेर... દાહોદ: ફતેપુરાના ડબગરવાસમાં ખેલૈયાઓ ડી... सूरत में ई-कक्षा बस से ग्रामीण विद्यार... जानराववाडीत पथदिव्यांसाठी एलईडी दिव्या... Breking news ey ravi name ka ladka 4 d... ગાંધીધામ: ક્રેટા કારમાંથી વિદેશી દારૂન...
17 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मानिवली व्यापारी येथे नवरात्रोत्सवाचे आयोजन.
मनोरंजन

मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मानिवली व्यापारी येथे नवरात्रोत्सवाचे आयोजन.

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 17 अक्टू. 2026, 02:46 PM 👁 79
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले.ठाणे.

तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
विशेष वृत्त ठाणे मुरबाड
दिनांक १७/१०/२०२६
नीड २४ न्यूज वृत्तसेवा (वार्ताहर):

मुरबाड मानिवली (व्या )

मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मानिवली व्यापारी येथे नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून 'आनंददायी शनिवार' उपक्रमांतर्गत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांसह गावातील महिला आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण 'सेवा सहयोग फाउंडेशन'चे सहकार्य ठरले. फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचे विविध रंजक व ज्ञानवर्धक प्रयोग दाखवण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची उत्सुकता वाढीस लागली. तसेच नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून महिलांसाठी पारंपारिक हळदी-कुंकू समारंभ आणि शालेय मुलींसाठी गरबा नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या आनंदाच्या वातावरणासोबतच महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांना भेडसावणारी ॲनिमियाची (रक्तक्षय) समस्या आणि हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे उद्भवणारे आजार याविषयी सविस्तर व मोलाची माहिती देण्यात आली.

याप्रसंगी 'सेवा सहयोग फाउंडेशन'च्या वतीने रश्मी भोईर,प्रांजल देसले , दिक्षा भोईर, दत्तात्रय व्यापारी, नितीन कोर आदी खास सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर मोहपे सर, सहाय्यक शिक्षिका नलिनी पाडवी, फुलपगार मॅडम, विलास गवाले सर, खाकर सर आणि आरती देसले यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये स्नेहा व्यापारी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. गावातील पालक आणि महिलांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीमुळे हा आनंददायी शनिवार अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक दिनकर मोहपे सर यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि आयोजकांचे आभार मानले.
📲Get App