Agriculture
मुरबाड तालुक्यातील फांगळोशी गावात उभ्या पिकांचे अतोनात नुकसान; पंचनामे करून तातडीने भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
Watch on:
▶️ YouTube
मुरबाड तालुक्यातील फांगळोशी गावात उभ्या पिकांचे अतोनात नुकसान; पंचनामे करून तातडीने भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
• मुख्य जिल्हा रिपोर्टर: काशिनाथ देसले, ठाणे
• तालुका रिपोर्टर: किशोर पवार, मुरबाड
• दिनांक: ११ ऑक्टोबर २०२६
मुरबाड, ठाणे:
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील फांगळोशी गावात (मंडल विभाग माळ) शेतकऱ्यांवर मोठे अस्मानी संकट ओढवले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे गावातील प्रतिष्ठित शेतकरी श्री. तानाजी बबन फनाडे यांच्यासह मोजे फांगळोशी परिसरातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वर्षभर रक्ताचे पाणी करून पिकवलेले उभे पीक डोळ्यांदेखत नष्ट झाल्याने येथील बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
फांगळोशी गावातील जवळपास प्रत्येक शेतकऱ्याचे शेत पिकांच्या नुकसानीमुळे उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे संपूर्ण गावात चिंतेचे वातावरण पसरले असून, संतप्त शेतकऱ्यांनी आता प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. पिकांचे पंचनामे रखडल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडणार आहे.
शेतकऱ्यांची प्रमुख मागणी:
गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येत प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. संबंधित क्षेत्राचे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी म्हणजे गावात येऊन झालेल्या नुकसानीचे रीतसर आणि पारदर्शक पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाने त्वरित योग्य आर्थिक नुकसान भरपाई जाहीर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा सूर फांगळोशी गावातील सर्व शेतकऱ्यांमधून उमटत आहे.