🔥 TRENDING श्री नीरज गुप्ता सीनियर नेता बीजेपी सम... Trump, Xi, and Putin Issue Joint 'Decl... Nagaland Dear Lottery Results 20 Nov 2... Nagaland’s JHADC Winter Session Commen... Manipur Launches Digi‑SAPNE 3.0 Digita... HAM(S) to Contest 20-25 Seats in 2027...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

मुरबाड शहर भाजपची धुरा तरुण तडफदार युवा नेतृत्व अभिजित खडकबाण यांच्या खां९द्यावर.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 20 Nov 2026, 04:24 PM 👁 30
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड.
दिनांक २१/११/२०२६
विशेष वृत्त
मुरबाड :ठाणे
मुरबाड शहरातील भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने मुरबाड शहर भाजपच्या अध्यक्षपदी तरुण, तडफदार आणि सक्रिय युवा नेतृत्व अभिजित अशोक खडकबाण यांची निवड करण्यात आली आहे. मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडीमुळे शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगामी मुरबाड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार किसन कथोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजप मुरबाड शहर व मुरबाड तालुका पश्चिम मंडळाच्या वतीने संघटनात्मक बैठक आणि पदनियुक्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. या बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करणे आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात आला. यापूर्वी मुरबाड शहर 'शक्ती केंद्रप्रमुख' म्हणून प्रभावीपणे काम करणाऱ्या अभिजित खडकबाण यांच्यावर पक्षाने आता शहर अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
अभिजीत खडकबाण हे उत्साही आणि दांडगा जनसंपर्क असलेले कार्यकर्ते म्हणून शहरात परिचित आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या पत्नी अपर्णाताई खडकबाण यांनीही यापूर्वी मुरबाडे ग्रामपंचायतीच्या सदस्या म्हणून काम पाहिले असून, त्यांच्या कुटुंबाला स्थानिक राजकारण आणि समाजकारणाचा चांगला अनुभव आहे.
या नियुक्ती समारंभास भाजप पश्चिम मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र भावार्थे, पूर्व मंडळाचे अध्यक्ष दीपक पवार, नगराध्यक्ष मोहन गडगे, माजी नगराध्यक्ष मोहन सासे, नगरसेवक मुकेश विशे , नगरसेवक संतोष जाधव, माजी शहराध्यक्ष सुधीरभाई तेलवणे, माजी पंचायत समिती सदस्य अनिल घरत, माजी नगरसेवक रविंद्र देसले, माजी नगरसेवक सुरेश नाना साबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर , खरेदी-विक्री संघाचे चेअरमन संतोष पवार, ॲड. सचिन चौधरी, मनोज देसले, नरेश मोरे, अतुल देशमुख, सागर चंभावणे, नगरसेविका मानसीताई मनोज देसले, नगरसेविका रविनाताई विनायक राव, नगरसेविका उर्मिलाताई सुजित ठाकरे, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष कैलास देसले यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📲Get App