🔥 TRENDING उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्... भंडारा: अप्पर पोलीस महासंचालकांच्या उप... ਸੋਨਾ 70,000 ਰੁਪਏ ਅਤੇ ਚਾਂਦੀ 2.70 ਲੱਖ ਰੁ... పాలకుర్తిలో గిరిజన సంఘాల భారీ నిరసన..... कालपी में संपूर्ण समाधान दिवस आयोजित,... ਜਥੇਦਾਰ ਕੁਲਦੀਪ ਸਿੰਘ ਗੜਗੱਜ ਗੁ. ਸ੍ਰੀ ਬੇਰ...
21 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Weather

मुरबाड आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी थंडीचा कडाका; पारा १४ ते १५ अंशांच्या घरात, शेकोट्या पेटल्या.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 21 Nov 2026, 07:28 PM 👁 23
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक २२/११/२०२६
थंडी विशेष वृत्त नीड २४न्यूज महाराष्ट्र स्पेशल.
मुरबाड / ठाणे : नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश आणि कोकण पट्ट्यात थंडीचा कडाका अचानक वाढला आहे. शहरी भागाच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर आणि बदलापूर या ग्रामीण व अंतर्गत भागांत थंडीची लाट अधिक तीव्र झाली असून पहाटेच्या वेळी नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरत आहे.
मुरबाड तालुक्यात रात्री आणि पहाटेच्या वेळी किमान तापमान कमालीचे खाली येत असून पारा १४ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावला आहे. विशेषतः सह्याद्रीच्या पायथ्याचा पट्टा, माळशेज घाट, सरळगाव, टोकावडे आणि धसई परिसरात थंडीचा जोर अधिक जाणवत असून पहाटेच्या वेळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील इतर अंतर्गत पट्ट्यातही किमान तापमान ११ ते १३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान घसरले असून शहापूर येथे १२.५ अंश सेल्सिअस, तर बदलापूरमध्ये १२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
मुंबईतही शनिवारी, २१ नोव्हेंबर रोजी किमान तापमानात मोठी घट होऊन पारा १६.२ अंश सेल्सिअसवर स्थिरावला. शुक्रवारी २१ अंश सेल्सिअस असलेले मुंबईचे तापमान अवघ्या २४ तासांत ४.८ अंश सेल्सिअसने घसरून यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. याशिवाय ठाणे शहरात १५.९ अंश, कल्याणमध्ये १४.६ अंश, डोंबिवलीत १५ अंश, कर्जतमध्ये १३.३ अंश, नेरळमध्ये १३ अंश, तर पनवेलमध्ये १५.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
थंडी वाढण्याचे कारण काय?
हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिना जसा पुढे सरकतो, तशी तापमानात होणारी ही घट कोकण आणि ठाणे पट्ट्यातील नेहमीची हंगामी प्रक्रिया आहे. सध्या ईशान्येकडून वाहणारे थंड आणि कोरडे वारे तापमानात घट होण्यास मदत करत आहेत. तसेच रात्रीच्या वेळी आकाश निरभ्र आणि हवामान शांत असल्याने जमिनीतील उष्णतेचे उत्सर्जन वेगाने होऊन किमान तापमान झपाट्याने खाली येत आहे. यामुळे मुरबाड, सह्याद्रीच्या पायथ्याचा परिसर आणि ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण कोकण पट्ट्यात सध्या गुलाबी थंडी आणि आल्हाददायक पहाटेचा अनुभव येत आहे.
📲Get App