🔥 TRENDING Andhra Pradesh CM Naidu Accuses Jagan... Centre approves ₹27,370 crore power tr... Gujarat Seeks Water From Neighbors Ami... BSF Apprehends Four Pakistani Fisherme... Gujarat Proposes Electricity-Water Tra... 16-Year-Old Boy Goes Missing in Deraba...
26 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

मला पळून न्या की राव’ लावणीचे रेकॉर्डिंग पूर्ण

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 26 Oct 2026, 01:22 AM 👁 36
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘मला पळून न्या की राव’ या लावणीचे रेकॉर्डिंग भक्ती स्टुडिओ, बेल्हे येथे उत्साहात पूर्ण

‘मला पळून न्या की राव’ लावणीचे रेकॉर्डिंग पूर्ण

बेल्हे | प्रतिनिधी 26 ऑक्टोंबर

तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘मला पळून न्या की राव’ या लावणीचे रेकॉर्डिंग भक्ती स्टुडिओ, बेल्हे येथे उत्साहात पूर्ण झाले. लेखक-कवी रामदास राऊत यांच्या लेखणीतून साकारलेल्या या लावणीला संगीतकार गणेश आस्वार यांचे संगीत असून गायिका राखी चौरे यांनी आवाज दिला आहे.

लावणीसाठी दर्शन नेटके व ऋषी मंडलिक यांनी रिदमची जबाबदारी सांभाळली. अविष्कार विश्वासराव यांच्या सहकार्याने रेकॉर्डिंग पूर्ण झाले.

ही लावणी तरुणाईसह जुन्या पिढीलाही आवडेल, असा विश्वास निर्माते रामदास राऊत यांनी व्यक्त केला. लवकरच उत्तम नृत्यकलाकारांच्या सहभागातून या लावणीचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
📲Get App