🔥 TRENDING વડોદરા: તરસાલી-સોમનાથ રોડ પર ડામર પીગળ... J&K CM Urges Bharat Ratna for CEC Afte... West Bengal Doctors Protest Over Alleg... Vigilance Bureau raids residence of Bi... Gandak River Embankments Breach at Two... 9-year-old girl dies as school stairca...
30 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिष्मा नायर कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट

✍️ Reporter: Vilas Supadu Patil 🗓 30 Sep 2026, 12:40 PM 👁 26
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

वैद्यकीय अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला

जिल्हा प्रतिनिधी विलास पाटील जळगाव जिल्हा.मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांची प्राथमिक आरोग्य केंद्र-कजगाव येथे अचानक भेट-जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी आज सायंकाळी 5.30 प्राथमिक आरोग्य केंद्र-कजगाव येथे अचानक भेट देऊन पाहणी केली.भेटी दरम्यान करिष्मा नायर यांनी आरोग्य विभागातील विविध उपक्रमांची माहिती घेऊन वैद्यकीय अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला.त्यांत प्रामुख्याने NQAS,सेवा संकल्प अभियान,श्री गणेशा आरोग्याचा अभियान,प्रसूती, लसीकरण,किटकजन्य व जलजन्य आजार,HPV लसीकरण,आयुष्यमान कार्ड, गोल्डन,आभा कार्ड आदी उपक्रम आणि बाबत आढावा घेऊन काम समाधानकारक असून अधिक काम वाढवावे अशा सूचना दिल्या.तसेच अंतर्गत व बाह्य स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले.HPV लसीकरणाचे काम अधिक वाढवावे अशा सूचना दिल्या. कार्यक्रम प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका पाटील, आरोग्य निरीक्षक श्रीकांत मराठे,अजित राजगुडे,औषध निर्माण अधिकारी उमेश महाजन,वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिकारी सौरभ अहिरे, आरोग्य सेविका उज्वला परदेशी,नलिनी परदेशी,बेबा पराडडे,लक्ष्मी तलांडे, परिचर गुणवंत मोरे आदी उपस्थित होते.
📲Get App