🔥 ट्रेंडिंग झारखंड NEET UG 2026: राउंड 3 पंजीकरण औ... झारखंड के निशांत कर्केटा इंटरनेट के नए... केंद्र ने न्यायाधीश सुनीता अग्रवाल, डी... केरल के मुख्यमंत्री वी. डी. सातेसेन ने... केरल एचसी ने केपीएससी से 58‑मार्क मूल्... पणजी : वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफ रीजनल स...
05 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
माकपाच्या नेतेचा महिलेवर अत्याचार , अकोल्यात गुन्हा दाखल

माकपाच्या नेतेचा महिलेवर अत्याचार , अकोल्यात गुन्हा दाखल

✍️ रिपोर्टर: Vitthal Krushna Khade 🗓 20 अग. 2026, 08:18 PM 👁 70
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नोकरीचे आमिष दाखवत सिन्नर तालुक्यातील विवाहितेवर अकोलेत अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

तेहतीस वर्षीय विवाहितेने या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. तुळशीराम मंगा कातोरे असे गुन्हा दाखल झालेल्याचे व्यक्तीचे नाव आहे.

अकोले तालुक्यातील कातोरे याचे पिडितेच्या घरी येणे जाणे होते. 'तुला अकोलेत जॉब लावून देतो, तू तेथेच रहा असे म्हणून त्याने जवळीक निर्माण केली. जॉबच्या निमित्ताने पिडितेला अकोलेत बोलावून घेत संबंध ठेव, नाहीतर नवऱ्याला जीवंत मारून टाकेल, अशी धमकी तेथे आल्यावर दिली. पती घरी नसल्याची संधी साधत त्याने पुन्हा

अकोलेत बोलावून घेतले. नाही आल्यास पतीला सगळं काही सांगेल, अशी धमकी दिली. त्या भितीपोटी पिडिता अकोलेत गेली. अकोलेतील लॉजवर नेत त्याने इच्छेविरोधात अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. झाला प्रकार कोणाला सांगितला तर कुटुंबाला संपविण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घडला प्रकार पिडितेचे पतीला सांगितल्यानंतर त्यांनी अकोलेत येत कातोरे यास जाब विचारला, काय तक्रार द्यायची ती दे, माझे वरपर्यंत हात असल्याचे सांगून त्याने तेथेही शिवीगाळ करत धमकी दिली. याच दरम्यान झटापटीत त्याचा मोबाईल खाली पडला, त्याचवेळी जमावही जमला, त्यामुळे त्याने मोबाईल सोडून तेथून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
📲Get App