महिंदळे शिवारात बिबट्याने आठ दिवसात तीन वासरांचा फडशा
यहाँ देखें:
▶️ YouTube
शेतकरी व.मजूर वर्गात भीतीचे वातावरण
महिंदळे शिवारात बिबट्याने आठ दिवसात पाडला तीन वासरांचा व अनेक कुत्र्याचा फडशा.
पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी.
महिंदळे परिसरात बिबट्याने गेल्या आठ दिवसात तीन वासरांचा व अनेक पाळीव कुत्र्यांचा फडशा पडला आहे. सोमवार रात्री अर्जुन धनराज पाटील यांचा दोन वर्ष वयाचा तीस हजार रुपये किमतीचा गोऱ्हा बिबट्याने फस्त केला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली तेथील पायांचे ठशावरून परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अनेक पशुपालकांनी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली.
गेल्या एक महिन्यापासून परिसरात अनेकांना बिबट्याचे दर्शन होत आहे. शिवारात अनेक शेतकऱ्याची गुरे शेतात बांधलेली असतात. काही जाळीत तर काही उघड्यावर आहेत. त्यात रात्री अर्जुन पाटील यांच्या बंदिस्त शेड मधून गोऱ्हा फस्त केला तर आठ दिवसापूर्वी विजय रामदास पाटील व दिलीप उदेसिंग पाटील यांची वासरी फस्त केली.तर अनेक शेतकऱ्यांचे शेतातील पाळीव कुत्रे फस्त केली आहेत.
शेतकरी व मजूर वर्गात भीतीचे वातावरण.
सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात कापूस वेचणी, मका, ज्वारी, बाजरी कापणीचे काम सुरु आहे. त्यात बिबट्याची दहशद असल्यामुळे मजूर वर्ग कामास येण्यास धजत नाहीत. त्यामुळे शेतीची कामे खोळंबोली आहेत. त्यामुळे वनविभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यावेळी पाचोरा वनविभाग परीक्षेत्राचे वनरक्षक फकिरा शिवदे, वनरक्षक संदीप पाटील, वनरक्षक प्रमिला अबुरे, वनरक्षक खतीजा शेख, वनसेवक मनोज शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.
प्रतिक्रिया
शेतकऱ्यांनी घाबरून न जाता रात्री शेतात जाताना हातात टॉर्च व काठी घेऊन जावे. आपले किमती पशुधन शेतात उघड्यावर बांधू नये. बिबट हा एका जागी राहत नाही. तो भक्षाच्या शोधात फिरत असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात एकटे जाऊ नये व आपली गुरे बंदिस्त शेड मध्ये बांधवी असे आवाहन केले.
फकिरा शिवदे
वनरक्षक पाचोरा वन विभाग.