🔥 TRENDING મહેસાણામાં 6-રાઉન્ડ ગોળીબારી કેસમાં શૂ... धनपुरी को मिलेगी मॉडल रोड की सौगात, जल... नवादा में परिवहन विभाग ने ई‑रिक्शा व द... आगरा के रहने वाले की करौली में ट्रैक्ट... अब व्यवसायिक वाहनों के रजिस्ट्रेशन से... ਅਦੇਸ਼ ਪ੍ਰਤਾਪ ਸਿੰਘ ਕੈਰੋ ਨੇ ਅਕਾਲੀ ਦਲ ਵਿੱ...
24 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Technology

महाराष्ट्राच्या तरुण प्रतिभेचा जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात डंका

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 24 Nov 2026, 03:00 PM 👁 38
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

महाराष्ट्राच्या तरुण प्रतिभेचा जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात डंका

महाराष्ट्राच्या तरुण प्रतिभेचा जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात डंका
अवघ्या २३व्या वर्षी यश पाटील यांची जागतिक स्तरावर ऐतिहासिक झेप ४.५ अब्ज डॉलरच्या AI अधिग्रहण करारात महत्त्वपूर्ण यश
महाराष्ट्राच्या सुपुत्राची जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी लेवा गुजर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा
पुणे भारतीय तरुणाईची बुद्धिमत्ता कल्पकता आणि जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याची जिद्द पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अवघ्या २३ वर्षांच्या यश पाटील या युवा उद्योजकाने कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जागतिक तंत्रज्ञान विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
यश पाटील हे अमेरिकेत स्थापन करण्यात आलेल्या Applied Computeया AI स्टार्टअपचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. त्यांच्या कंपनीचा जगातील आघाडीच्या सायबर सुरक्षा कंपन्यांपैकी एक असलेल्या Palo Alto Networks सोबत तब्बल ४.५ अब्ज अमेरिकन डॉलर मूल्याचा अधिग्रहण करार निश्चित झाला आहे या व्यवहारानंतर यश पाटील यांच्याकडे Co-Chief AI Officer ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
Applied Compute ही कंपनी उद्योग आणि व्यवसायांना त्यांच्या स्वतःच्या डेटाच्या आधारे अत्याधुनिक AI मॉडेल्स विकसित करणे प्रशिक्षित करणे आणि सुरक्षितपणे वापरणे यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून देते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रात या कंपनीने अल्पावधीत मिळवलेले यश विशेष उल्लेखनीय आहे
लेवा गुजर समाजासाठी अभिमानाची बाब
यश पाटील यांचे मूळ गाव मामाचे मोहिदा असून ते संजय भगवान पाटील यांचे सुपुत्र आहेत तसेच ते स्वर्गीय डॉ भगवान इंदास पाटील यांचे नातू आहेत
यश यांच्या आईचे माहेर नवापूर असून त्या स्वर्गीय दशरथ दुल्लभ पाटील यांच्या कन्या आहेत.
अशा कर्तृत्ववान कुटुंबातील यश यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या अथक परिश्रमांच्या आणि दूरदृष्टीच्या जोरावर जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात मिळवलेले हे यश निश्चितच संपूर्ण कुटुंबासाठी समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे
अवघ्या २३व्या वर्षी जागतिक स्तरावरील एवढ्या मोठ्या व्यावसायिक आणि तांत्रिक यशाला गवसणी घालणे ही असामान्य कामगिरी आहे यश यांचा प्रवास आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे वयापेक्षा विचार मोठे असतात संधीपेक्षा कौशल्य महत्त्वाचे असते आणि स्वप्नांपेक्षा ती प्रत्यक्षात उतरवण्याची जिद्द अधिक महत्त्वाची असते हा संदेश त्यांच्या यशातून मिळतो
आज जागतिक स्तरावर AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात भारतातील तरुण आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत यश पाटील यांची ही झेप त्याच सामर्थ्याचे उत्तम उदाहरण आहे
केदारेश्वर लेवा गुजर प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन
केदारेश्वर लेवा गुजर प्रतिष्ठान पुणे परिवाराच्या वतीने यश पाटील यांचे या अभूतपूर्व आणि गौरवास्पद यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा
यश यांच्या रूपाने आपल्या लेवा गुजर समाजातील तरुण प्रतिभेला जागतिक व्यासपीठावर मिळालेली ही ओळख निश्चितच समाजातील असंख्य विद्यार्थी आणि युवकांना प्रेरणा देणारी आहे
त्यांच्या हातून भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी नवनवीन विक्रम घडोत त्यांच्या कर्तृत्वाने भारताचा आणि आपल्या समाजाचा गौरव जागतिक स्तरावर अधिक उंचावो हीच केदारेश्वर लेवा गुजर प्रतिष्ठान पुणे परिवाराची मनःपूर्वक सदिच्छा
यश पाटील यांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

केदारेश्वर लेवा गुजर प्रतिष्ठान पुणे
📲Get App