🔥 TRENDING Uttarakhand Survey: BJP Secures 53.4%... Delhi Suffers Severe Smog, AQI Rises t... Delhi Man Sentenced to Life for Strang... Delhi Court Grants Bail to Drone Parts... 2 साल पुरानी कार की कीमत 2,00,000 रुपय... प्रधानमंत्री ने किया पताही हवाई अड्डा...
21 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

महाराष्ट्र राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशन २०२६ मध्ये सत्यशोधका विषयी मंत्री छगन भुजबळ यांनी आपले विचार मांडले

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 21 Nov 2026, 04:16 PM 👁 30
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

महाराष्ट्र राज्य विशेष सत्यशोधक अधिवेशन २०२६ मध्ये सत्यशोधक विषयी मंत्री छगन भुजबळ यांनी आपले विचार मांडले

महाराष्ट्र राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशन २०२६ओतूर मध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मृतीला उजाळा दिला त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली मुलींचे शिक्षणची सुरुवात भिडे वाड्यातू सुरू झाली ओतुरला त्यांनी ४ चौथ्या क्रमांकाची शाळा सुरू केली अशा अनेक शाळा काढल्या आणि स्त्री शिक्षणाचा प्रसार केला. महात्मा फुले व सावित्री फुले हे कुठलाच जाती धर्म पंथ यामध्ये भेदभाव करत नव्हते प्रत्येकाला शिक्षण मिळाले पाहिजे स्त्री असो की पुरुष कुठल्याही जातीचा किंवा धर्माचा त्यासाठी त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली अनेक लोकांनी त्यांना विरोध केला परंतु ज्योतिबा थांबली नाही तसेच सती जाण्याची परंपरा सुद्धा सावित्रीबाई फुले व महात्मा फुले बंध केली छत्रपती शिवाजींचे समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढली आणि शिवजयंती सुरू केली अशा प्रकारे अनेक कामे ज्योतिराव फुले व सावित्रीबाईंनी केली यासाठी लोकांनी त्यांना भरपूर त्रास दिला परंतु सत्याचा शोध घेण्याचं काम आणि लोकांना न्याय देण्याचे काम ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले नेहमी करत असे आज आपण ज्या महिला उच्चपदस्थ आहेत त्यांच्या मागे सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचे मोठे योगदान आहे आजची स्त्री पुरुषाला खांद्याला खांदा देऊन अनेक ठिकाणी काम करत आहे याचे खरे श्रेय महात्मा फुले आणि ज्योती फुले यांना आहे महिलांना चूल आणि मूल यामध्ये न गुंतवता त्यांनी समाजात येऊन काम केले पाहिजे आणि त्यासाठी ज्योतिराव फुले व सावित्री फुले यांनी प्रयत्न केले आजच्या घडलेल्या स्त्रिया मागे अठराव्या शतकातील फुले कुटुंबाचा मोठा आहे हात आहे त्यामुळे लोकांनी जातीधर्म न पाळता जगले पाहिजे आणि एकमेका साह्य केले पाहिजे असं मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
📲Get App