🔥 TRENDING रोहित कुमार पटेल एडवोकेट के यहां प्रति... Bangladeshi Actor Sohel Khan Dies Duri... Mammootty’s ‘Mela’ Wraps 100-Day Shoot... Tamil Nadu Collector Files Complaint A... Tamil Nadu collector files complaint a... Priyansh Arya Sets New Indian T20 Reco...
24 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

मोहप जलसिंचन तलावातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी; मुरबाड तहमोहप जलसिंचन तलावातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी;

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 24 Nov 2026, 12:50 PM 👁 37
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
भाजीपाला पिक विशेष वृत्त
दिनांक २४/११/२०२६.
मुरबाड: पावसाने यंदा लवकर उघडीप दिल्याने ओढ्याचा प्रवाह बंद झाला असून, मुरबाड तालुक्यातील पाच गावांतील उभी भाजीपाला पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर मोहप जलसिंचन तलावातील पाणी शेतीसाठी ओढ्यात सोडण्यात यावे, अशी मागणी मोहप, नारायणगाव, वडाचा पाडा, आंबेळे आणि शिवळे येथील शेतकऱ्यांनी केली आहे. या निवेदनाची गंभीर दखल घेत मुरबाडच्या तहसीलदारांनी संबंधित विभागाला "तात्काळ नियमोचित कार्यवाही करावी" असे आदेश दिले आहेत.
नेमके प्रकरण काय?
मोहप जलसिंचन तलावाच्या पाण्यावर परिसरातील अनेक शेतकरी व सुशिक्षित तरुण भेंडी, काकडी, मिरची आणि वांगी यांसारख्या भाजीपाला पिकांचे उत्पादन घेऊन आपला रोजगार चालवतात. मात्र, सध्या पाण्याअभावी ही उभी पिके करपून जाण्याच्या स्थितीत आहेत. तलावामध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्याने, आवश्यक पाणीपातळी राखून किमान एक ते दोन वेळा मर्यादित प्रमाणात पाणी ओढ्यात सोडल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे निवेदनात म्हटले आहे.
काही ग्रामस्थांच्या विरोधामुळे पेच
या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाच्या (मुरबाड) उपअभियंत्यांकडे स्वतंत्र निवेदन दिले आहे. मात्र, काही ग्रामस्थांकडून पाणी सोडण्यास विरोध होत असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांची प्रशासनाला हमी
भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, याची पूर्ण जाणीव ठेवून शेतकऱ्यांनी नवीन लागवड थांबवली आहे. तसेच शासनाचे सर्व नियम व आदेश पाळण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही देत शेतकऱ्यांनी मागील वर्षी भरलेल्या पाणीपट्टीच्या पावत्यांच्या प्रतीही निवेदनासोबत जोडल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या या आर्जवानंतर मुरबाड तहसीलदारांनी २४ नोव्हेंबर रोजी पत्रावर तात्काळ नियमानुसार कार्यवाही करण्याचे शेरे मारल्याने आता पाटबंधारे विभाग काय भूमिका घेते आणि शेतीसाठी पाणी कधी सुटते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
📲Get App