🔥 TRENDING తణుకు మున్సిపల్ ఎన్నికల్లో మహిళా ఓటర్ల... తణుకు మున్సిపల్ ఎన్నికలలో 64.02% ఓటర్ల... ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಡಿ.ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಅಬ್ಬರದ ಭಾ... 🚔ਨਵੇਂ ਐਸ.ਐਸ.ਪੀ. ਤਰਨ ਤਾਰਨ ਵੱਲੋਂ ਪ੍ਰੈੱਸ... Ruturaj Gaikwad Misses Maharashtra SMA... BRS Gains Momentum in Telangana as Lok...
26 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

महामार्गाचा पुन्हा बळी! तरसोद फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत ५८ वर्षीय इसमाचा मृत्यू....!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 26 Nov 2026, 08:21 PM 👁 24
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जळगाव
नादुरुस्त महामार्गावर अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. तरसोद फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत जळगाव शहरातील ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २५ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. संतोष रामदास सोनवणे (वय ५८, रा. हरिओम नगर, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

या महामार्गावरील हा चौदावा बळी असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात असून, या घटनेमुळे महामार्गाच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे

संतोष सोनवणे हे हरिओम नगर परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होते. २५ नोव्हेंबर रोजी ते एका नातेवाईकाच्या हळदी समारंभासाठी दुचाकीने दुसखेडा येथे गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री ते आपल्या दुचाकीने जळगावकडे परतत होते. रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास तरसोद फाट्याच्या पुढे भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की, संतोष सोनवणे हे रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. अपघातानंतर गंभीर अवस्थेत असतानाही त्यांनी आपल्या मुलाला दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. वडिलांच्या अपघाताची माहिती मिळताच मुलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

जखमी संतोष सोनवणे यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या शरीरावर गंभीर दुखापती झाल्याने उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संतोष सोनवणे यांच्या निधनाची बातमी समजताच हरिओम नगर परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि अंकुश सोनवणे व मुन्ना सोनवणे अशी दोन मुले आहेत.

महामार्गाची दुरवस्था हेच कारण?

संबंधित महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. रस्त्यावरील खड्डे, अपुऱ्या सोयीसुविधा आणि देखभालीचा अभाव यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गावर वारंवार अपघात घडत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि अपघात रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वारंवार अपघात होऊनही रस्त्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होत नसल्याने प्रशासनाने आता तरी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
📲Get App