🔥 ट्रेंडिंग मुजफ्फरपुर: नवविवाहिता की संदिग्ध मृत्... ओंकारेश्वर में कलशाभिषेक महोत्सव: भक्त... కుంటాల జలపాతం రీల్స్కి మిలియన్స్ వ్యూస... भारत गेट के स्विमिंग पूल में गंदे पानी... જે.એમ.પટેલ દિગેન્દ્રનગર સાર્વજનિક હાઇસ... पुलिस ने स्टंट करने वाली 7 पावर बाइक ज...
26 सित. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मुरबाडमध्ये मोठे पाऊल! २०० हून अधिक महिलांनी घेतला शेतकरी दाखल्यांचा लाभठाणे/मुरबाड:महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मुरबाड तालुक्यात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले

✍️ रिपोर्टर: Kashinath Dhondu Desale 🗓 26 सित. 2026, 08:20 PM 👁 12
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मुरबाडमध्ये मोठे पाऊल! २०० हून अधिक महिलांनी घेतला शेतकरी दाखल्यांचा लाभठाणे/मुरबाड:महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मुरबाड तालुक्यात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. फणसोली ग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या 'महिला शेतकरी प्रमाणपत्र मोहिमे' अंतर्गत आज मुरबाड येथे महिलांसाठी विशेष 'शेतकरी दाखले' वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला मुरबाडमधील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला असून, तब्बल २०० हून अधिक गरजू महिलांनी या सुविधेचा थेट लाभ घेत आपले शेतकरी दाखले प्राप्त केले आहेत.प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन:या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला कृषी सहाय्यक अधिकारी माननीय मंडलिक साहेब, तसेच अनुलोम - भाग संवादिनी शिल्पा ज्ञानेश्वर व्यापारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. उपस्थित मान्यवरांनी महिलांना या प्रमाणपत्राचे शेती क्षेत्रातील व वैयक्तिक प्रगतीसाठी असलेले महत्त्व पटवून दिले. तसेच, या दाखल्याद्वारे मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या फायद्यांविषयी महिला भगिनींना सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे यश:हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर कोलेकर आणि परेश पोगेरे यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य आणि उपस्थित महिला भगिनींच्या उत्साहामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला.जिल्हा रिपोर्टर: काशिनाथ देसले, ठाणे.तालुका रिपोर्टर: किशोर पवार, मुरबाड.
📲Get App