🔥 TRENDING HPSOS 2027: PCP Class Dates, Attendanc... Punjab Assembly's Special Session Conc... Meghalaya Final Electoral Roll: 2 Fore... Shillong Champions Cup 2026 Begins Nov... Karnataka bounce back to dismiss Tripu... Beed Court to Auction Assets of Dnyanr...
27 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

मोबाईल हरवल्याच्या वादातून वीटभट्टी कामगाराचा खून; आरोपीला अटक

✍️ Reporter: Yallappa Rayagond Ragate 🗓 27 Oct 2026, 09:14 AM 👁 21
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
📰 मोबाईल हरवल्याच्या वादातून वीटभट्टी कामगाराचा खून; आरोपीला अटक
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव शिवारात मोबाईल हरवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका वीटभट्टी कामगाराची हत्या झाल्याची घटना घडली. या प्रकरणी मंदूप पोलिसांनी संजय परशुराम धरेनवर याला अटक केली आहे.
मृत कामगाराचे नाव बुडाप्पा तिपण्णा देसाई (वय ४०, मूळ रा. शेपणगिरी, ता. अफजलपूर, जि. गुलबर्गा) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर रोजी बुडाप्पा देसाई आणि संजय धरेनवर हे दोघे दारू पिण्यासाठी बाहेर गेले होते. यावेळी संजयचा मोबाईल हरवला. हा मोबाईल बुडाप्पाने घेतल्याचा संशय संजयने व्यक्त केला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. बुडाप्पाने मारहाण केल्यामुळे संजयच्या मनात राग होता, असे वृत्तात नमूद आहे.
📲Get App