🔥 TRENDING Two Escapees Jump From Jalandhar Court... 20 People Fall Ill After Shraddha Feas... Six Arrested in Chitrakoot Tea‑Shop Br... मुरबाडचे ज्येष्ठ काँग्रेस नेते व कुणबी... માતર તાલુકાના ગરમાળા ગામમાં રોહિત યુવક... નાની વાવડી ગામમાં ગણેશ ચતુર્થી મહોત્સવ...
15 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

लातूर:शिक्षणाची पंढरी आणि 'लातूर पॅटर्न'साठी देश-विदेशात ओळखल्या जाणाऱ्या लातूर शहरातून आज एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर आली आ

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 15 Sep 2026, 09:02 PM 👁 10
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले. तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड यांना :मिळालेल्या माहिती नुसार शिक्षणाची पंढरी आणि 'लातूर पॅटर्न'साठी देश-विदेशात ओळखल्या जाणाऱ्या लातूर शहरातून आज एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. येथील सुप्रसिद्ध शिक्षण संस्थाचालक संजीव चंद्रभानू सोनवणे (वय ६२) यांनी शहरातल्या पद्मानगर भागातील आपल्या राहत्या घरी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे . ही हृदयद्रावक घटना आज, १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी उघडकीस आला .घरी होते एकटेच, मुंबईतील बहिणीला केला होता शेवटचा फोनमिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना १४ आणि १५ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली असावी . संजीव सोनवणे यांच्या पत्नी सध्या मुलीला भेटण्यासाठी परदेशात गेल्या असल्याने आणि मुलेही परदेशात नोकरीला असल्याने ते घरात एकटेच होते आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुंबईत राहणाऱ्या आपल्या बहिणीला फोन करून तातडीने लातूरला येण्यास सांगितले होते बहीण आज सकाळी लातूर येथील निवासस्थानी पोहोचली असता, हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला.इंग्रजीतील सुसाईड नोट पोलिसांच्या ताब्यातघटनेची माहिती मिळताच एमआयडीसी (MIDC) पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा केला पोलिसांना त्यांच्या बेडरूममध्ये इंग्रजी भाषेत लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली आहे.यात "माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये आणि पोलिसांनी माझ्या आत्महत्येचा कोणताही तपास करू नये" असे सोनवणे यांनी लिहून ठेवल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ही सुसाईड नोट पुढील तपासासाठी जप्त केली आहे.खासगी क्लासेसच्या वाढत्या सुळसुळाटातून नैराश्य?एका अत्यंत यशस्वी शिक्षण महर्षीने असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत लातूर जिल्ह्यात विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लासेसचे पेव मोठ्या प्रमाणावर फुटले आहे या अनधिकृत आणि व्यावसायिक स्पर्धांमुळे अधिकृत कनिष्ठ महाविद्यालयांना मोठी उतरती कळा लागली असून विद्यार्थी प्रवेशावर गंभीर परिणाम झाला आहे या प्रशासकीय, शैक्षणिक आणि आर्थिक अडचणींमुळे आलेल्या प्रचंड नैराश्यातूनच त्यांनी स्वतःला संपवले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे .शिक्षण क्षेत्रातील मोठा धक्कासंजीव सोनवणे यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून अभियांत्रिकीचे (Engineering) शिक्षण पूर्ण केले होते मात्र, शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी लातूरमध्ये 'संकल्प क्लासेस' आणि २००५ मध्ये वडिलांच्या स्मरणार्थ 'डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय' स्थापन केले . त्यानंतर सोलापूर, बार्शी आणि पुण्याच्या खडकवासला परिसरातही त्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे विस्तारले होते. ते महाराष्ट्राचे माजी मंत्री कै. केशवराव सोनवणे यांचे पुतणे होते.शहराचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस घरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल डिटेल्सच्या आधारे पुढील तपास करत आहेत संजीव सोनवणे यांच्या अशा अकाली आणि धक्कादायक जाण्यामुळे लातूर आणि जळकोट परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्तुळात तीव्र शोककळा पसरली आहे - जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले.
सिटीझन रिपोर्टर किशोर पवार.
📲Get App