🔥 TRENDING Manipur Deputy CM Nemcha Kipgen Launch... Imphal Fire Service Announces New Stat... Meghalaya Prepares for Golden Jubilee... Meghalaya Cabinet Extends Term of Garo... Heat City: Antarpath – Chapter One Tra... Jailer 2 trailer fuels strong day‑one...
08 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोणावळ्यात मोठी कारवाई

✍️ Reporter: सतिश हजारे 🗓 08 Oct 2026, 01:06 AM 👁 21
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

लोणावळ्यात अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई; लाखोंचे कोकेन जप्त!

मोठी कारवाई

लोणावळ्यात अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई; लाखोंचे कोकेन जप्त!

खंडाळा हद्दीत सापळा रचून तरुणाला अटक; पनवेल हून विक्रीसाठी ड्रग्ज आणल्याचा पोलिसांचा संशय

लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील खंडाळा हद्दीत अंमली पदार्थविरोधी टास्कफोर्स (कोल्हापूर कृती विभाग, पुणे) यांनी मोठी कारवाई करत १४० ग्रॅम ७४ लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त केले आहे. या कारवाईत सोनू सिताराम उपाध्याय (वय 36, रा. पनवेल) याला अटक करण्यात आली आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबरच्या रात्री खंडाळा येथील केरावाला सोसायटीजवळ अंधारात संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या सोनू उपाध्याय याच्यावर पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

तपासणीदरम्यान त्याच्याकडे खाकी चिकटपट्टीने गुंडाळलेल्या प्लास्टिक पिशवीत कोकेन आढळून आले. पोलिसांनी हे अमली पदार्थ जप्त केले असून त्याची किंमत सुमारे लाखो रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्राथमिक तपासात आरोपी पणवेलहून लोणावळा परिसरात विक्रीच्या उद्देशाने हे अमली पदार्थ घेऊन आल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी पोलीस अंमलदार संतोष सोनवणे यांच्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

🚨 लोणावळ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची कारवाई; नेटवर्कचा शोध घेण्याचे आव्हान!
📲Get App