🔥 TRENDING Amar Singh Devanda makes history with... India Rebukes Turkey for Being Barred... All-Party Meeting Kickstarts Odisha As... Cyclone Akvan Expected to Bring Very H... ONGC gas leak in Andhra Pradesh forces... Cyclone Akvan to Hit Andhra Pradesh on...
17 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

लोणावळ्यात २० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक ACBच्या जाळ्यात!

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 17 Nov 2026, 01:15 PM 👁 61
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कायद्याचे रक्षकच लाचखोरीच्या प्रकरणात अडकत असल्याची धक्कादायक घटना लोणावळा येथे समोर आली

लोणावळ्यात २० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक ACBच्या जाळ्यात!

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी १ लाख ३० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; पुणे ग्रामीण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पुणे जिल्हा रिपोर्टर 17 नोव्हेंबर 2026

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी आणि कायद्याचे रक्षण करण्यासाठी असतात. मात्र, कायद्याचे रक्षकच लाचखोरीच्या प्रकरणात अडकत असल्याची धक्कादायक घटना लोणावळा येथे समोर आली आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACB रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात नाथा रामकिसन केकाण वय ३८ वर्ष राहणार.साई व्हिजन सोसायटी, रावेत असे ताब्यात घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील कलमे कमी करण्यासाठी तसेच जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने संबंधित पोलीस उपनिरीक्षकाने १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर ACB पथकाने पडताळणी करून सापळा रचला. या कारवाईदरम्यान २० हजार रुपये स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती आहे.

पोलीस दलात खळबळ

या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवरच लाचखोरीचे आरोप झाल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे भ्रष्टाचाराविरोधात प्रशासनाची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपासातून आणखी काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📲Get App