🔥 TRENDING Police nab five suspects in advocate m... Delhi Court Seeks Police Report on Cus... Angel Tetarbe Honoured with Internatio... Emmys to Stream Premier Television Awa... Emmys to Shift to Amazon Prime Video S... Short Film Premiere Scheduled in Marqu...
07 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोणावळया मध्ये आजोबा ने आपल्या नातवाला गोळी घालून संपवले

✍️ Reporter: सतिश हजारे 🗓 07 Oct 2026, 03:45 AM 👁 14
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

लोणावळ्यात आजोबांनीच झाडली नातवावर रायफल मधुन गोळी तरुण नातवाच्या जागीच मृत्यू कौटुंबिक वादातून भुशीतील हॉटेलमध्ये थरार; सीसीटीव्ही, डीव्हीआर लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

लोणावळ्यात आजोबांनीच झाडली नातवावर रायफल मधुन गोळी तरुण नातवाच्या जागीच मृत्यू
कौटुंबिक वादातून भुशीतील हॉटेलमध्ये थरार; सीसीटीव्ही, डीव्हीआर लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, पाच जणांवर गुन्हा लोणावळा: लोणावळा शहरातील भुशी गावच्या हद्दीत असलेल्या मोतीराम हॉटेलमध्ये कौटुंबिक वादातून आजोबांनी आपल्याच नातवावर परवानाधारक रायफलमधून गोळी झाडून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिव्हीआर (DVR) लपविल्याप्रकरणी पोलिसांनी एकाच कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास भुशी येथील मोतीराम हॉटेलमध्ये ही घटना घडली. मोतीराम रावजी मराठे (वय ८३ वर्षे) याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून आपल्याकडे असलेल्या परवानाधारक १२ बोअर रायफलमधून नातू ॲड. अभय माणिक मराठे (वय ३२ वर्षे, रा. घर क्र. ४, तुळसा निवास, भुशी, लोणावळा) याच्यावर गोळी झाडली. यामध्ये अभय मराठे याचा जागीच मृत्यू झाला.
सीसीटीव्ही आणि डिव्हीआर गायब करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

घटनेनंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी आणि घटना दडपण्यासाठी मयताचे चुलते हिरामण मोतीराम मराठे (वय ५४ वर्षे), चुलत भाऊ मनोज हिरामण मराठे (वय ३२ वर्षे), कविता हिरामण मराठे (वय ५० वर्षे) आणि हिरामण यांची बहीण राजश्री दशरथ पवार (वय ५८ वर्षे) यांनी आपसात संगनमत केले. आरोपींनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज असलेला डिव्हीआर व कॅमेरे काढून ते अज्ञात ठिकाणी लपवून ठेवले.पोलीस उपनिरीक्षकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

याप्रकरणी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सदानंद सावंत (वय ३६) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी १) मोतीराम रावजी मराठे, २) हिरामण मोतीराम मराठे, ३) मनोज हिरामण मराठे, ४) कविता हिरामण मराठे आणि ५) राजश्री दशरथ पवार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), २३८, २४१, ३(५) सह आर्म ॲक्ट कलम ३, २७(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.घटनेची नोंद लोणावळा शहर पोलीस ठाण्यात ६ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील करत आहेत.
📲Get App