🔥 TRENDING Rajinikanth's 'Jailer 2' grosses over... माँ दुर्गा का भव्य जागरण: भक्तों ने की... ग्वालियर के बेहट में 16 से 18 अक्टूबर... Car Crashes into Truck on Udaipur High... Rajasthan NEET 2026 Stray Vacancy Regi... Suspect Confesses to Parvinder Singh '...
17 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
लोणीत वाचन प्रेरणा दिन उत्साहात; ग्रंथदिंडीने दिला वाचन संस्कृतीचा संदेश...!      डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम; ‘शब्द मोहोर’ पुस्तकाचे प्रकाशन..!!

लोणीत वाचन प्रेरणा दिन उत्साहात; ग्रंथदिंडीने दिला वाचन संस्कृतीचा संदेश...! डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम; ‘शब्द मोहोर’ पुस्तकाचे प्रकाशन..!!

✍️ Reporter: Surendra Uttam Sonawane 🗓 17 Oct 2026, 09:18 AM 👁 24
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
( लोणी, ता. आंबेगाव ) : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि ज्ञानासोबतच विचारशक्ती व व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, या उद्देशाने लोणी येथे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. विकास वाचनालय, माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी, श्री भैरवनाथ विद्याधाम आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथदिंडी, प्रभातफेरी, वाचन कट्टा आणि पुस्तक प्रकाशन असे उपक्रम राबविण्यात आले.

ग्रंथदिंडीने गावात वाचनाचा जागर...!

कार्यक्रमाची सुरुवात श्री भैरवनाथ विद्याधामपासून विकास वाचनालयापर्यंत काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने झाली. त्यानंतर गावातून प्रभातफेरी काढून वाचनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी आयोजित वाचन कट्ट्यामुळे त्यांना पुस्तकांशी संवाद साधण्याची आणि वाचनाची आवड जोपासण्याची संधी मिळाली.

या वेळी विद्यालक्ष्मी प्रकाशन व वितरण संस्थेच्या प्रकाशिका योगिता अक्षय सुतार आणि लेखक मुबा मुंढे सर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ‘शब्द मोहोर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

वाचनातून विचारांची समृद्धी...!

माइंड मिरॅकलच्या संस्थापिका सोनाली खाडे यांनी ‘शोध मनाच्या अस्तित्वाचा, वाचन संस्कृती, विचारांची समृद्धी आणि व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. वाचनामुळे विचारांना व्यापकता मिळते, आकलनशक्ती वाढते आणि व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांसोबत अवांतर वाचनालाही महत्त्व द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती......

कार्यक्रमाला पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, लोकनियुक्त सरपंच डॉ. सावळाभाऊ नाईक, आंबेगाव तालुका भाजप पूर्व मंडळाचे किरणशेठ वाळुंज, तांबे महाराज, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप कोचर, माजी विद्यार्थी प्रबोधिनीचे संचालक संतोष पडवळ, संघाचे माजी संचालक चंद्रकांत गायकवाड, बाळासाहेब वाळुंज, आंबेगाव तालुका दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष प्रकाश सिनलकर, हर्षल सुतार, उद्योजक सुधीर सोनार, विशाल उदागे आणि अमित क्षीरसागर उपस्थित होते.

याशिवाय शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गीतांजली लंके, उपाध्यक्ष राहुल भागवत, माधुरीताई खंडागळे, विकास वाचनालयाचे संस्थापक व कार्यवाहक ग्रंथामित्र धों. स. सुतार गुरुजी, अध्यक्ष रमेश धों. सुतार, संचालक अक्षय उमेश सुतार, श्री भैरवनाथ प्रशालेचे प्राचार्य सुनील थोरात आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीचे मुख्याध्यापक मुबीन मुंढे यांच्यासह शिक्षक, पदाधिकारी, विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले.

या उपक्रमातून वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांबद्दल आस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाचनाची सवय ही ज्ञानसमृद्ध आणि विचारशील पिढी घडविण्यासाठी महत्त्वाची असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
📲Get App