🔥 TRENDING Delhi Firm Gifts iPhone 16 to Staff fo... Kohli Stuns Crowd with One-Handed Divi... Rivar Group inks ₹3,000 crore MoU with... Fact Check: AI‑Generated Video Misrepr... Virat Kohli's unbeaten 82 powers India... The Modern Data Company inks MoU with...
05 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोन पिराचे येथे चारा साक्षरता व संवर्धन अभियान संपन्न

✍️ Reporter: Vilas Supadu Patil 🗓 26 Oct 2026, 08:12 PM 👁 62
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पशुवैद्यकीय चिकित्सालय कजगाव यांच्या वतीने

लोन पिराचे येथे 'चारा साक्षरता व संवर्धन अभियान' यशस्वीरीत्या संपन्न
जिल्हा प्रतिनिधी विलास पाटील भडगाव
पशुवैद्यकीय चिकित्सालय, कजगाव यांच्या वतीने आज लोन पिराचे येथे आयोजित करण्यात आलेले'चारा साक्षरता व संवर्धन अभियान'मोठ्या उत्साहात पार पडले. संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला गावातील शेतकरी आणि पशुपालकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांचे प्रबोधन
या अभियानांतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश मंत्री यांनी उपस्थित शेतकऱ्यांना चारा नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. वाळलेला, कडक आणि निकृष्ट चारा फेकून न देता, त्यावर 'युरिया प्रक्रिया' करून तो सकस, मऊ आणि पौष्टिक कसा बनवावा, याचे जिवंत प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवण्यात आले. यामुळे चाऱ्याची नासाडी टळून जनावरांना उत्तम पोषण कसे मिळेल, हे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळाले.
जागेवरच भरून घेतले चारा बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज
केवळ मार्गदर्शनच नाही, तर या कार्यक्रमात शेतकऱ्यांना थेट शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष पुढाकार घेण्यात आला. शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या 'चारा बियाणे वाटप' योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची मागणी नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज थेट जागेवरच मोबाईलद्वारे भरून घेण्यात आले. यामुळे अनेक पशुपालकांची बियाण्यांची मागणी सहजपणे नोंदवली गेली असून, त्यांना वेळेवर बियाणे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ऐन टंचाईच्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन मिळाल्यामुळे आणि जागेवरच बियाणे मागणीचे अर्ज भरून घेतल्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी मोठे समाधान व्यक्त केले....
- डॉ. ऋषिकेश मंत्री
(पशुवैद्यकीय अधिकारी, कजगाव, ता. भडगाव)
📲Get App