🔥 TRENDING 11 से 28 जनवरी तक होंगी यूपी बोर्ड की... Priyansh Arya Scores 181 in 68 Balls,... Vir Das Loses Second International Emm... Real Kashmir FC Misses Out at 54th Int... Vijay Sethupathi, Vir Das and Manav Ka... Tasmania Police Officer Shooting: Shoo...
24 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

.लोकप्रिय आमदार मा. किसन कथोरे साहेबांचा पुन्हा एकदा विकासकामांचा धडाका; ग्रामीण प्रवाशांच्या सुविधेसाठी तब्बल १५ कोटींचा निधी मंजूर!.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 23 Nov 2026, 06:54 PM 👁 39
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड.
दिनांक २४/११/२०२६
विशेष ST निवारा शेड वृत्त
मुरबाड ठाणे :
मुरबाड / ठाणे (प्रतिनिधी) :
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणारे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असणारे लोकप्रिय आमदार मा. किसन शंकर कथोरे साहेब यांच्या विशेष आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांना पुन्हा एकदा मोठे यश आले आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एस.टी. प्रवाशांची वर्षानुवर्षे असलेली मोठी गैरसोय आता कायमची दूर होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) ठाणे विभागांतर्गत येणाऱ्या मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी आणि शहापूर तालुक्यांतील ग्रामीण भागातील प्रवासी मार्गांवर एकूण २५ नवीन प्रवासी निवारा शेड (बस थांबे) उभारण्यासाठी तब्बल १५ कोटी रुपयांची (१५.०० कोटी) प्रशासकीय व वित्तीय मंजुरी प्राप्त झाली आहे.
प्रवाशांच्या व्यथा जाणून घेतला धडाकेबाज निर्णय:
ग्रामीण भागातून दररोज तालुक्याच्या किंवा शहराच्या ठिकाणी शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त ये-जा करणारे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, कष्टकरी शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना बसची वाट पाहताना कडक ऊन, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक ठिकाणी निवारा नसल्याने प्रवाशांना उघड्यावर किंवा आजूबाजूच्या दुकानांचा आसरा घेऊन ताटकळत उभे राहावे लागत होते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन गावोगावच्या नागरिकांनी आणि प्रवासी संघटनांनी बस थांब्यांवर सुसज्ज निवारा शेड उभारण्याची मागणी केली होती.
आ. कथोरे साहेबांचा पाठपुरावा आणि प्रशासनाचे सहकार्य:
जनतेच्या या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाची तात्काळ दखल घेत लोकप्रिय आमदार मा. किसन कथोरे साहेब यांनी राज्य शासन आणि परिवहन महामंडळाकडे युद्धपातळीवर पाठपुरावा केला. तसेच, या कामांच्या तांत्रिक बाबी, जागेची पाहणी आणि स्थानिक पातळीवरील नियोजनात मुरबाड बस आगाराचे व्यवस्थापक मा. मुसळे साहेब यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. आ. कथोरे साहेबांच्या अथक प्रयत्नांना अखेर मोठे यश आले असून, तब्बल १५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय व वित्तीय हिरवा कंदील मिळाला आहे.
मंजूर निधीतून या गावांमध्ये उभारले जाणार सुसज्ज निवारा शेड:
या मंजूर कामांमध्ये मुरबाड विधानसभा मतदारसंघातील आणि परिसरातील खालील प्रमुख गावांचा समावेश करण्यात आला आहे:
• मुरबाड तालुका (१२ गावे): म्हसा, सासणे, शिरवली, नारिवली, किशोर धसई, पोटगाव, मिल्हे, तुलई, खानिवरे, कोरावळे, शिवळे आणि उमरोली (बळेगाव).
• अंबरनाथ तालुका (११ गावे): रहाटोली, कासगांव, सोनावळे, येवे, पिंपळोली, बारवीडॅम, सांबारी, चरगांव, बोराडपाडा, कुडेरान आणि धारोळा.
• कल्याण तालुका: दहागाव.
या प्रमुख गावांसह भिवंडी आणि शहापूर तालुक्यातील इतर ग्रामीण भागांतील महत्त्वाच्या प्रवासी मार्गांवरही या निधीतून आधुनिक, मजबूत आणि सर्व सुविधांनी युक्त असे बस थांबा निवारा शेड उभारण्यात येणार आहेत.
सर्व स्तरांतून आ. कथोरे साहेबांचे अभिनंदन:
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या लोकप्रिय आमदार मा. किसन कथोरे साहेब यांच्या दूरदृष्टीमुळे आणि कार्यतत्परतेमुळे हा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे. या सुसज्ज निवारा शेडमुळे विशेषतः पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात विद्यार्थ्यांचे, महिलांचे व वृद्धांचे होणारे हाल थांबणार असून, ग्रामीण प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे. या भरीव निधीबद्दल मतदारसंघातील नागरिक, प्रवासी संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून आ. कथोरे साहेब तसेच आगार व्यवस्थापक मा. मुसळे साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानत अभिनंदन केले जात आहे.
📲Get App