🔥 ट्रेंडिंग प्रधानमंत्री आवास योजना से मेंड्रा निव... રાજકોટમાં આંબેડકર ચોક નજીક પરેશ ચૌહાણન... LCB ઝોન-8એ 4 વર્ષથી ફરતા વાહનચોરી આરોપ... Mathura मिशन शक्ति से मिला बेटियों को... उत्तर प्रदेश एड्स नियंत्रण सोसाइटी कर्... અમદાવાદમાં 'મિશન સાયબર રક્ષિકા' હેઠળ 8...
13 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
शिक्षा

खानापूर जिल्हा परिषद शाळेत शौचालयांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय, कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या टाळाटाळीमुळे जीव धोक्यात

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 13 अक्टू. 2026, 03:50 PM 👁 23
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

खानापूर जिल्हा परिषद शाळेत शौचालयांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांना मूलभूत स्वच्छतेची सुविधा मिळत नाही, तर कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या टाळाटाळीमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

भोर तालुक्यातील खानापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या अनेक महिन्यांपासून मुतारी आणि शौचालयाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. योग्य सुविधांअभावी लहान मुलांना नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर जावे लागत असून, यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. या गंभीर समस्येकडे संबंधित ठेकेदार (कंत्राटदार) आणि संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, शाळेचे व मुतारीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरती फायबर शौचालय करण्यास टाळाटाळ करत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

विद्यार्थ्यांना जावे लागतेय उघड्यावर..

शाळेत सुमारे ४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, हक्काचे शौचालय आणि मुतारीच उपलब्ध नसल्याने या चिमुरड्यांना नाईलाजास्तव शाळेच्या बाहेरील मोकळ्या जागेत किंवा उघड्यावर जावे लागते. ग्रामीण भागात झाडीझुडपे आणि मोकळ्या परिसरात साप, विंचू किंवा इतर हिंस्र प्राण्यांचा वावर असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत उघड्यावर जाणाऱ्या या निष्पाप विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे..

ठेकेदाराची मुजोरी आणि टाळाटाळ..

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या मुतारी व शौचालय बांधकामाचे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. परंतु, संबंधित ठेकेदार हे काम पूर्ण करण्यास सातत्याने टाळाटाळ करत आहे. स्थानिक नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी वारंवार विनंती करूनही ठेकेदाराकडून संथ गतीने काम सुरू आहे किंवा कामाकडे पूर्णपणे पाठ फिरवली जात आहे. ठेकेदाराच्या या मुजोर आणि बेजबाबदार पद्धतीमुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.


पालक आणि ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

"एकीकडे शासन 'स्वच्छ भारत अभियान' आणि 'हागणदारी मुक्त गाव' यांसारख्या घोषणा देत असताना, दुसरीकडे शासकीय शाळेतील मुलांनाच उघड्यावर जावे लागत आहे ही अत्यंत शरमेची बाब आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक पालकांनी दिली आहे.

या प्रकरणी भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) आणि शिक्षण विभाग या ठेकेदारावर नोटीसी कारवाई करणार असल्याचे सांगितले आणि शाळेला पुढील दोन दिवसात तात्पुरत्या स्वरूपात फायबर शौचालयाची सोय करून देणार आहे. चंद्रकांत विपट गटविकास अधिकारी, भोर
📲Get App