🔥 TRENDING जंतर-मंतर पर सीजेपी के प्रदर्शन ऐलान प... CEIR પોર્ટલની મદદથી રાજુલા પોલીસે ગુમ... ગાંધીનગરમાં આરોગ્ય સેવાઓને વધુ અસરકારક... Student Union Nominations Kick Off in... BJP Leaders Honour Gopabandhu Das on H... INDIA Bloc Thanks Odisha Citizens for...
09 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

खाकीला लाभली डिजिटलची जोड! ‘उत्सव प्रहरी’ प्रणाली विकसित करणारे WEKRAM चे संचालक तुषार कथोरे यांचा पालघर पोलीस दलाकडून विशेष सन्मान

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 09 Oct 2026, 08:08 PM 👁 14
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
खाकीला लाभली डिजिटलची जोड! ‘उत्सव प्रहरी’ प्रणाली विकसित करणारे WEKRAM चे संचालक तुषार कथोरे यांचा पालघर पोलीस दलाकडून विशेष सन्मान!
२४न्यूज (24News) - विशेष वृत्त
जिल्हा रिपोर्टर: काशिनाथ देसले, ठाणे
तालुका रिपोर्टर: किशोर पवार, मुरबाड
दिनांक: १०/१०/२०२६
मुरबाड / पालघर:
पोलीस प्रशासन अधिक सक्षम, सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानस्नेही बनवण्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे मुरबाडचे सुपुत्र आणि 'WEKRAM Technologies' चे संस्थापक व संचालक श्री. तुषार बळवंत कथोरे यांचा पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला आहे. पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पालघर जिल्हा पोलीस दलासाठी सण व उत्सवांच्या काळातील व्यवस्थापन आणि समन्वय अधिक अचूक व गतिमान व्हावे, यासाठी तुषार कथोरे यांनी ‘उत्सव प्रहरी’ ही आधुनिक डिजिटल उत्सव व्यवस्थापन व समन्वय प्रणाली (Digital Festival Management & Coordination System) विकसित केली आहे. त्यांच्या याच महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन हा विशेष सत्कार करण्यात आला.
यापूर्वीही शासकीय पातळीवर उमटवलाय तांत्रिक ठसा:
श्री. तुषार कथोरे यांनी पोलीस दलाला आधुनिकतेची जोड देण्याचे काम यापूर्वीही चोखपणे बजावले आहे. त्यांनी विकसित केलेली Blockchain आधारित 'MMTS मुद्देमाल व्यवस्थापन प्रणाली' पोलीस दलात अत्यंत उपयुक्त ठरत आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र शासनाच्या ‘कार्यालयीन सुधारणा उपक्रमात’ मुरबाड पोलीस स्टेशन व ठाणे जिल्हा पोलीस दलाला संपूर्ण राज्यात राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवून देण्यात कथोरे यांचे तांत्रिक योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. त्यानंतर आता पालघर पोलीस दलाकडून मिळालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे.
प्रशासनाचे मानले आभार:
"पोलीस प्रशासन अधिक सक्षम आणि डिजिटल बनविण्याच्या आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना मिळालेली ही एक महत्त्वपूर्ण प्रेरणा आहे," अशा भावना श्री. तुषार कथोरे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या. तसेच त्यांनी या बहुमानाबद्दल पालघर जिल्हा पोलीस दल आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
तुषार कथोरे यांच्या या कौतुकास्पद यशामुळे मुरबाड तालुक्यासह संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..
📲Get App