🔥 ट्रेंडिंग जिले में 49 ग्रामीण आशा कार्यकर्ता के... साइक्लोन मुरासु घटकर डिप्रेशन, कोस्टल... मुरासु चक्रवात 3 नवंबर को आंध्र प्रदेश... सफाई अभियान गुजरात के मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल ने... जीएमडीसीएल के शेयर 9% बढ़े, बाजार में...
04 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
धर्म

खडकवासल्यातील मस्जिद ट्रस्टने शिवकालीन देवस्थानला चार गुंठे जमीन बक्षीस, राष्ट्रीय एकात्मकतेचा संदेश

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 04 नव. 2026, 03:22 PM 👁 50
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पुण्यातील खडकवासला येथे मस्जिद ट्रस्टने शिवकालीन श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टला चार गुंठे जमीन बक्षीस दिली आहे. या जमिनीवर बहुपयोगी सांस्कृतिक भवन उभारण्याचे काम सुरू करण्यात आले असून, या निर्णयामुळे हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश दिला आहे.

पुण्यातील खडकवासला येथील शिवकालीन श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टला बिलाल मस्जिद ट्रस्टकडून चार गुंठे जमीन बक्षीस देण्यात आली आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेली आणि लाखो रुपयांची किंमत असलेली ही जमीन मुस्लिम बांधवांनी हिंदू धर्माच्या शिवकालीन देवस्थानसाठी देऊन राष्ट्रीय एकात्मकतेचा स्पष्ट संदेश दिला आहे.

या बक्षीस दिलेल्या जागेवर भाविकांच्या सुविधेसाठी बहुपयोगी सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजनही पार पडले आहे. खडकवासला गावातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांमधील अनेक वर्षांपासून सुरू असलेले सलोख्याचे संबंध या निर्णयामुळे अधिक दृढ झाले आहेत.

मुस्लिम समाजाने मस्जिद ट्रस्टची जमीन देवस्थानच्या विधायक कामासाठी बक्षीस देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मानवतावादी विचारांचा जागर केला आहे, असे नागरिकांकडून म्हटले जात आहे. सामाजिक एकतेचे दर्शन घडविणाऱ्या खडकवासल्याला ही नवीन ओळख मिळाल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
📲Get App