🔥 TRENDING Maharashtra tiger reserves become new... VHP urges exclusion of Muslims from Ma... Two Coaches of Sikkim Mahananda Expres... Public health over popularity, says Tu... Maharashtra FDA chief unveils pioneeri... Maharashtra FDA seeks response from fi...
06 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

खेड येथील 'नमो दहीहंडी उत्सवात' ६ वर्षीय चिमुरड्या कैवल्य सुतारच्या ढोलकी वादनाने वेधले सर्वांचे लक्ष; भाजप नेत्यांकडून गौरव

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 06 Sep 2026, 01:58 PM 👁 10
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

खेड तालुक्यात आयोजित 'नमो दहीहंडी उत्सवात' कळंबणी बुद्रुक येथील ६ वर्षीय चिमुकला ढोलकी वादक कैवल्य किशोर सुतार याने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. याबद्दल भाजप आणि राजवैभव प्रतिष्ठानतर्फे त्याचा यथोचित गौरव करण्यात आला.

खेड: भारतीय जनता पार्टी व राजवैभव प्रतिष्ठान खेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य "नमो दहीहंडी उत्सवा"मध्ये एका ६ वर्षीय चिमुरड्याच्या ढोलकी वादनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक (सुतार वाडी) येथील उगवता तारा आणि चिमुकला ढोलकी वादक कु. कैवल्य किशोर सुतार (वय ६ वर्षे) याने आपल्या उत्कृष्ट कलेच्या जोरावर उपस्थित मान्यवर आणि रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.

या उत्सवाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी व राजवैभव प्रतिष्ठान खेड यांच्या वतीने कैवल्यचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्याच्या या अद्भूत कलेचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष अँड. वैभवजी खेडेकर, तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी आणि अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तथा गटनेते रहीम भाई सहिबोले उपस्थित होते.

या कौतुक सोहळ्याला नगरसेविका सौ. वैभवी वैभव खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ. नीता केतन उर्फ राजू आंब्रे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अँड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, युवा मोर्चा खेड शहर सरचिटणीस अभिलाष डंबे आणि सोशल मीडिया संयोजक अंकुश मिर्लेकर यांच्यासह भाजप व युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कैवल्यच्या या उत्कृष्ट सादरीकरणामुळे त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
📲Get App