🔥 TRENDING મહીસાગરમાં સ્ટેમ્પ કૌભાંડનો પર્દાફાશ:... Ranbir Kapoor's 'Ramayana' Eyes Rs 150... Ramayana Opens to Rs 160 Cr on Day 1,... Sikkim Reports Clean Air Across All Mo... Sikkim CM Briefed on Pending Hill Regi... 13 Cyclists Launch Himalayan Expeditio...
04 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
National

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन प्रकरणाचा यशस्वी तपास; महिला पोलीस निरीक्षक प्रभवती एकुरके यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचा दक्षता पदक

✍️ Reporter: DOCTOR PINTU PAUL 🗓 04 Nov 2026, 04:08 PM 👁 12
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन प्रकरणाचा यशस्वी तपास; महिला पोलीस निरीक्षक प्रभवती एकुरके यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचा दक्षता पदक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन प्रकरणाचा यशस्वी तपास; महिला पोलीस निरीक्षक प्रभवती एकुरके यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचा दक्षता पदक

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या फोन प्रकरणाचा यशस्वी तपास केल्याबद्दल महिला पोलीस निरीक्षक प्रभवती एकुरके यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने दक्षता पदक प्रदान करण्यात आले आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, धाडस आणि तपासातील कौशल्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे.
दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात जीवे मारण्याची धमकी देणारे तीन फोन आले होते. या संवेदनशील प्रकरणाचा तपास करताना बेळगाव कारागृहातून जयेश कांथा ऊर्फ जयेश पुजारी याने बेकायदेशीररीत्या मोबाईलचा वापर करून धमकीचे फोन केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
या प्रकरणाचा सखोल तपास करताना महिला पोलीस निरीक्षक प्रभवती एकुरके यांनी दाखविलेली तत्परता, धाडस, कर्तव्यनिष्ठा आणि तपासकौशल्य उल्लेखनीय ठरले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांची दक्षता पदकासाठी निवड केली.
त्यांच्या या राष्ट्रीय सन्मानामुळे महाराष्ट्र पोलीस दलाचा गौरव वाढला असून, महिला पोलीस अधिकारीही अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक गुन्ह्यांच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.
महिला पोलीस निरीक्षक प्रभवती एकुरके यांचे या राष्ट्रीय सन्मानाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
📲Get App