🔥 TRENDING भोटा में दशहरा उत्सव में दूर‑दूर से आए... सिंहस्थ-2028 तैयारियों में तेजी: संभाग... Karachi’s Garba Nights Mirror Gujarat’... Mumbai Police Blocked from Securing La... BJP Names Shagun Parihar, Hemang Joshi... Drug Inspector, DSP Suspended in Jhota...
21 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

कंत्राटदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थकीत देयकांसाठी तीव्र आंदोलन; दिवाळीपूर्वी पैसे न मिळाल्यास अधिक आक्रमक होणार.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 21 Oct 2026, 07:01 PM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
कंत्राटदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थकीत देयकांसाठी तीव्र आंदोलन; दिवाळीपूर्वी पैसे न मिळाल्यास अधिक आक्रमक होणार
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे:
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
ठाणे विशेष वृत्त :
विकासकामे पूर्ण करूनही वर्षानुवर्षे हक्काची देयके (बिल्स) न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कंत्राटदारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दिवाळी सण तोंडावर आलेला असतानाही प्रशासनाकडून निधी थकीत ठेवण्यात आल्याने अनेक कंत्राटदार प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील विविध भागांत कंत्राटदारांनी रस्ते, इमारती आणि इतर शासकीय विकासकामे वेळेत पूर्ण केली आहेत. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे या कामांची देयके गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेली आहेत. "आम्ही कर्ज काढून आणि स्वतःचे पैसे लावून कामे पूर्ण केली, पण आता बँकांचे हप्ते आणि मजुरांचे पगार देणे कठीण झाले आहे," अशी व्यथा आंदोलनकर्त्या कंत्राटदारांनी मांडली.
आंदोलकांनी हातात "Pay Us Now" आणि मागण्यांचे फलक घेऊन प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. दिवाळीपूर्वी सर्व थकीत देयके तात्काळ अदा करण्यात यावीत, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. जर प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढला नाही, तर आगामी काळात संपूर्ण जिल्ह्यातील विकासकामे बंद पाडून अधिक तीव्र आणि आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे.
📲Get App