🔥 TRENDING रायपुर में संपत्तिकर के बड़े बकायादारो... যুব মোর্চার সভাপতি কে বিজয়া শুভেচ্ছা... যুব মোর্চার সভাপতি কে বিজয়া শুভেচ্ছা... mathura vrindavan ब्रज रज उत्सव में गं... Assam officials inspect tobacco shops... Assam Cabinet Names Dr Harsha Bhattach...
24 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

१३,५०० कोटींच्या जलविद्युत प्रकल्पासाठी कर्जतमध्ये तब्बल १,००० झाडे तोडली; पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 23 Oct 2026, 11:13 PM 👁 10
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
१३,५०० कोटींच्या जलविद्युत प्रकल्पासाठी कर्जतमध्ये तब्बल १,००० झाडे तोडली; पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप
विशेष प्रतिनिधी, नीड २४ न्यूज
दिनांक: २४ ऑक्टोबर २०२६
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक २४/१०/२०२६.
कर्जत/रायगड:ठाणे
कर्जत तालुक्यातील सायडोंगर भागात प्रस्तावित असलेल्या टोरेंट पॉवर कंपनीच्या ३,००० मेगा वॅट जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वीच एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संभाव्य भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर, प्रकल्पाच्या जागेची साफसफाई करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर थेट १,००० हून अधिक झाडे तोडली गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
२३३ हेक्टर वनक्षेत्रावर कुऱ्हाड
या महाप्रकल्पासाठी एकूण ३७० हेक्टर जागेची गरज असून त्यापैकी तब्बल २३३ हेक्टर जागा वनक्षेत्राची आहे. भूसंपादन आणि पुनर्वसनाची प्रक्रिया कायदेशीररीत्या अद्याप पूर्ण झालेली नसतानाही, एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केल्याने प्रकल्पाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तोडण्यात आलेल्या झाडांमध्ये अनेक वर्षांची जुनी आणि मोठी झाडे असल्यामुळे सायडोंगर परिसरातील हिरवेगार वैभव पूर्णपणे नष्ट झाले आहे.
स्थानिकांचा आक्रमक पवित्रा
भालीवली , आंबोट, पोटल पाली आणि ढाक या गावांमधील बाधित शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी या वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवला आहे. "एकीकडे आमच्या जमिनींचा आणि पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, आणि दुसरीकडे प्रशासनाने रात्रीत आमच्या हक्काची निसर्गसंपदा नष्ट करायला सुरुवात केली आहे," असा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा चाललेला हा बळी थांबवावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी आंदोलनाची ठिणगी?
पुढील महिन्यात ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या १३,५०० कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीमुळे कर्जत तालुक्यात पर्यावरणाची ठिणगी पडली आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात पर्यावरण संघटना न्यायालयात जाण्याच्या तयारीत असून, पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी तीव्र निदर्शने होण्याचे संकेत मिळत आहेत.
📲Get App