🔥 TRENDING Bhagat Singh Sena Chief Seeks AAP Supp... Vishwanath Ballidav Appointed As Raich... लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश कडोदरा की महालक्ष्मी सोसाइटी में गुजरा... રાજકોટ: 2 વર્ષની બાળકીની હત્યામાં માતા... Kochi Youth Dies in Germany Building F...
16 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Health

कष्टकरी नगरमध्ये भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ६२ जणांची तपासणी, ५ जण पुढील उपचारासाठी संदर्भित

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 15 Oct 2026, 11:50 PM 👁 7
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 'क्षयरोगमुक्त भारत – १०० दिवस मोहीम' या उपक्रमाचा भाग म्हणून पनवेलमधील कष्टकरी नगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ६२ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

कष्टकरी नगर येथील समाज मंदिर हॉलमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘क्षयरोगमुक्त भारत – १०० दिवस मोहिमे’च्या अनुषंगाने एका भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ६२ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या ५ रुग्णांना अष्टविनायक हॉस्पिटल, मोहपाडा (रसायनी) येथे संदर्भित करण्यात आले.

भारतीय महाक्रांती सेना, आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य, अष्टविनायक फाउंडेशन, अष्टविनायक हॉस्पिटल (मोहपाडा, रसायनी), जिल्हा क्षयरोग केंद्र रायगड आणि जिल्हा आरोग्य विभाग व ग्रामपंचायत तुराडे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये रक्तदाब (BP), रक्तातील साखर (RBS), ईसीजी (ECG) यांसारख्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तसेच डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला, क्षयरोगाविषयी जनजागृती आणि विविध आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आजारांचे वेळेत निदान व्हावे आणि गरजू नागरिकांना योग्य उपचार मिळावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनिकेत मेस्त्री (MJPJAY विभाग, MOD – Manager On Duty) यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्यासमवेत डॉ. चैतन्य गवारे, स्टाफ नर्स स्नेहल कांबळे, सानिका वायसे, सहाय्यक अशोक उगलमुगले आणि आरोग्य मित्र जयराम शिंगवा यांनी रुग्ण तपासणी व व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

तसेच गुलसुंदे उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी श्रीमती. प्रियांका अतकरे, परिचारिका श्रीमती. अपर्णा पाटील, आरोग्य सेवक.माधव नलावडे, आशा सेविका नजमा साखरकर, प्रतीक्षा चव्हाण व ज्योत्स्ना देशमुख यांनी आरोग्यविषयक कामकाजात सहकार्य केले. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच सौ. रंजना गायकवाड, माजी उपसरपंच श्री.विश्वनाथ गायकवाड आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका श्रीमती उपरे मॅडम यांनीही शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उल्लेखनीय सहकार्य केले. सर्वांच्या समन्वयातून हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

आरोग्य सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, क्षयरोगाबाबत जनजागृती करणे आणि आजारांचे वेळेत निदान करून योग्य उपचार उपलब्ध करून देणे, या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. भविष्यातही भारतीय महाक्रांती सेना व सहकारी संस्थांनी अशा मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन सातत्याने करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
📲Get App