🔥 TRENDING Iranian creators use Bollywood memes t... Teacher suspended after minor student... Syed Mushtaq Ali Trophy 2026-27: How t... Films ‘Dhurandhar’ and ‘Kantara Chapte... Lop Sharma Blames Congress for Mislead... Coach Viadero lands in Goa to helm FC...
16 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त शहाद्यात भव्य रक्तदान शिबीर व गुणवंत गौरव सोहळा संपन्न

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 16 Nov 2026, 08:31 AM 👁 33
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त शहाद्यात भव्य रक्तदान शिबीर व गुणवंत गौरव सोहळा संपन्न

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त शहाद्यात भव्य रक्तदान शिबीर व गुणवंत गौरव सोहळा संपन्न
क्रांतिसूर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून बिरसा मुंडा चौक, शहादा येथे भव्य रक्तदान शिबीर व आदिवासी गुणगौरव सोहळा २०२६ अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशदादा पाडवी होते. प्रमुख वक्ते म्हणून सातपुडा पावरा समाज संघाचे (महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्ष व मुंबई मंत्रालयातील उपअभियंता इंजि. रवींद्र आर्य आणि 'ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन'चे (मध्यप्रदेश राज्य) अध्यक्ष प्रा. डॉ. विनोद ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून शहाद्याचे तहसीलदार संभाजी पाटील व पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली.
​रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सामाजिक बांधिलकी जपत अनेक मान्यवर व तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुळे, नायब तहसीलदार दीपक गवते, नागझिरीचे उपसरपंच सचिन पावरा, संतोष पवार सर, रामदास पावरा व रामसिंग पावरा आदींनी रक्तदान करून समाजप्रबोधनाचा आदर्श घालून दिला.
​गुणवंतांचा सत्कार
या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा इंजि. रवींद्र आर्य व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये जंपरोप राष्ट्रीय खेळाडू राहुल सुळे, हॉकी राष्ट्रीय खेळाडू निता ठाकरे, लेखक व कवी संतोष पावरा, प्रा. दिनेश पावरा आणि कु.ड्रॉ.कीर्तिका दिलीप खेडकर ms स्त्री रोग यांचा समावेश होता.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमासडॉ. रवींद्र वळवी, नायब तहसीलदार दीपक गवते, तालुका कृषी अधिकारी अनिल निकुम, माजी जिल्हा परिषद सदस्य मदन पवार व धरमसिंग पावरा, नगरसेवक एकनाथ नाईक, पाणीपुरवठा सभापती प्रदीप ठाकरे, नगरसेवक जितेंद्र जमदाळे, नगरसेवक रतिलाल निरगुळे, खेडदिगरच्या माजी सरपंच मंजुळाताई मुसळदे, मनमोडे सरपंच देविदास पावरा, वडगाव सरपंच दिनेश पावरा, दुधखेडा सरपंच रमेश पावरा, सरपंच सुभाष वाघ, कमल पावरा, गृहपाल बबलू मोरे, रक्तदूत अमोल जाधव, घोडसे सर, मंगेश बरडे, जय युवा ब्रिगेडचे शहादा तालुका अध्यक्ष सुनील माळीच, सामाजिक कार्यकर्ते राजू सोनावणे, अनिल चव्हाण, इंजि. महेश रावताळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोजन व सहकार्य
हा संपूर्ण कार्यक्रमएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय (नंदुरबार), क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशीय संस्था (शहादा) आणि कै. कलावती पाडवी फाउंडेशन (तळोदा) यांच्या संयुक्त विद्यमाने व सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील सुळे, संचालक रामसिंग पावरा, करणसिंग तडवी, सचिन पावरा, रवींद्र ठाकरे सरपंच सुभाष वाघ रामदास पावरा व रक्तपेढी संक्रमण अधिकारी जिल्हा रुंगानालय नंदुरबार यांनी विशेष परिश्रम घेतले.
📲Get App