🔥 TRENDING વડનગરની પવિત્ર ધરા પર આયોજિત આ ધાર્મિક... Haryana to Pilot ATM Security Alert Sy... Live Stream: Saurashtra vs Haryana SMA... Haryana's Paddy Arrivals Drop 16% to 1... छत्रपती संभाजीनगर में नशा‑गोली तस्कर श... Isgec Heavy Engineering hits Rs 23.87...
17 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

कार्तिकी एकादशीनिमित्त म्हसा ते चेरवली २६ व्या भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन; उद्यापासून भक्तिमय पर्वाला सुरुवात.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 17 Nov 2026, 10:15 AM 👁 19
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
दिनांक १७/११/२०२६.
.विशेष वार्ता पत्र.
मुरबाड (प्रतिनिधी):
पावन अशा कार्तिकी एकादशीच्या औचित्यावर नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र खांबलिंगेश्वर मंदिर म्हसा ते श्री क्षेत्र गोरक्षनाथ मठ चेरवली या भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सन २००१ मध्ये सुरू झालेल्या या भक्तिमय परंपरेचे यंदाचे हे २६ वे वर्ष असून, उद्या बुधवार दि. १८ नोव्हेंबर २०२६ ते रविवार दि. २२ नोव्हेंबर २०२६ (कार्तिक शु. अष्टमी ते कार्तिक शु. द्वादशी) या कालावधीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
सर्वश्री योगी शिलनाथजी, महंत योगी किसननाथजी, रिध्दीनाथजी, बिजनाथजी, बाळकनाथजी, दयानाथजी, फूलनाथजी, रामदासजी, जानकीनाथजी, गोपीनाथजी, खुशीनाथजी, अक्षयनाथजी, कमळनाथजी, दत्तात्रेय महाराज सरजीने व शिवस्वरूप गोरक्ष काका यांच्या कृपाशीर्वादाने या दिंडीचे आयोजन केले जाते. म्हसा, आंबेगाव, आंबेटेंभे, गवाळी, बोरीवली, कान्होळ, तोंडली १, २, ३, मोहघर, काचकोळी, सासणे, न्हावे, केदुर्ली, रावगांव, शेलारी, साजई, शिरवली, काकडपाडा, टेंभरे, जा.पाडा, मानिवलीपाडा, मानिवली, बोराडपाडा, शिंदीपाडा, आर्डे, अंबरनाथ, मुळगांव, सांबरी, आसोसे, नेरळ, कळंब, चिखले, मुरबाड, नढई, डेहनोली, आंबेळे बु., माल्हेड, खाटेघर, भुवन, शिवळे, मोहोप, उंबरपाडा, सरळगांव, वडवली, किन्हवली, चेरवली परिसर आणि पंचक्रोशीतील तमाम भाविक भक्तांच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न होत आहे.
दिंडीचे सविस्तर वेळापत्रक:
बुधवार दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजता श्री क्षेत्र खांबलिंगेश्वर मंदिर, म्हसा येथून दिंडीचे भव्य प्रस्थान होईल व सायंकाळी हरिपाठ आणि ह.भ.प. केशव महाराज घरत (आंबेगाव) यांचे प्रवचन होईल. गुरुवार दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी कान्होळ येथे नाष्टा, ह.भ.प. प्रकाश महाराज सासणे यांचे प्रवचन व श्रीराम मंदिर, न्हावे येथे दुपारचे भोजन होईल. सायंकाळी श्री. जगन पागधरे यांचे प्रवचन होऊन किन्हवली येथे रात्रीचा मुक्काम राहील.
शुक्रवार दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी मानिवली येथे नाष्टा, दुपारी ह.भ.प. केशव घरत (गुरुजी) यांचे प्रवचन व शिवळे येथे भोजन होईल. सायंकाळी मुरबाड व शिवळे येथे चहापाणी होऊन विठ्ठल रखुमाई मंदिर (शिवळे) येथे लक्ष्मण महाराज शिंगोळे यांचे प्रवचन व ज्ञानोबा तुकोबा मंदिर, मोहोप येथे मुक्काम असेल. शनिवार दि. २१ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीनिमित्त खापरी, शिवळे, पतंगरपाडा आणि किन्हवली येथे फराळाचे नियोजन केले आहे. रात्री ९:०० ते १:०० या वेळेत चेरवली मठ येथे ह.भ.प. धनाजी महाराज भोईर (उच्चविद्याविभूषित, रावगांव) यांचे कीर्तन व त्यानंतर मुरबाड-शहापूर आणि अंबरनाथ येथील भजनी मंडळांचा जागर भजनाचा कार्यक्रम रंगेल. सोहळ्याच्या सांगता दिवशी रविवार दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:०० ते ११:०० या वेळेत ह.भ.प. धनाजी महाराज भोईर यांचे काल्याचे कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजन पदाधिकारी व सेवाभावी समिती:
या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प. रामभाऊ दळवी (शिवळे ग्रा.), दिंडीचालक ह.भ.प. धनाजी महाराज भोईर (रावगांव), चोपदार ह.भ.प. कडूशेठ कडव (मानिवली) व काशीशेठ दळवी (केदुर्ली), मार्गदर्शक ह.भ.प. केशव महाराज घरत, विणेकरी ह.भ.प. मंगल महाराज उगले व ह.भ.प. कमलाकर दळवी हे काम पाहत आहेत. दिंडीसाठी श्री. विठ्ठल श. घिरी व गजानन वि. घिरी (शिवळे) यांच्याकडून विनामूल्य ट्रकसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सेवाभावी समितीमध्ये श्री. राजाराम सा. कडव, श्री. मनोहर वा. देशले, श्री. तानाजी या. चौधरी, श्री. दत्ताराम आशिवले, श्री. रामदास घरत, श्री. गोविंद दु. घोरड, श्री. जगन अ. घोरड, श्री. दिपक वें. भोईर, श्री. परेश शं. कडव, श्री. संतोष बा. भोईर, श्री. काशिनाथ वा. बांगर, श्री. देविदास पा. म्हात्रे आणि श्री. तुकाराम वा. वागे यांचा समावेश आहे.
सर्व वारकऱ्यांनी चोपदार व दिंडीचालकांच्या सूचनांचे पालन करावे, आपल्या वळकटीवर नाव टाकून आणावे, मौल्यवान वस्तू सोबत आणू नयेत आणि दिंडीमध्ये स्वच्छता राखावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या स्वानंदसुखाचा लाभ घ्यावा, अशी विनंती सेवाभावी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
📲Get App