🔥 TRENDING Over 30 African and Asian Nations to S... ભચાઉ અપહરણ કેસ: પોલીસે ૪ આરોપીઓને ૭ લા... Central Government Launches National T... ATM chor Night temperatures to plunge in Belaga... ડિંડોલી પોલીસે રોંગ સાઈડમાં વાહન ચલાવન...
14 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

कुणबी समाजोन्नती मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमांवर भर; १८ ऑक्टोबरला वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 14 Oct 2026, 04:50 PM 👁 8
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
कुणबी समाजोन्नती मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमांवर भर; १८ ऑक्टोबरला वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक १५/१०/२०२६.
विशेष वृत्त मुरबाड
मुरबाड तालुका कुणबी समाजोन्नती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा सकाळी ठीक १०:३० वाजता 'कुणबी भवन', साजईफाटा, म्हसा रोड येथे पार पडणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
या सभेमध्ये मंडळाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांवर विशेष चर्चा होणार आहे. यामध्ये युवक-युवतींसाठी प्रशिक्षण शिबिरे, आरोग्य शिबिरे, रोजगार विनिमय केंद्र, वधू-वर सूचक केंद्र आणि वाचनालय यांसारख्या समाजोपयोगी उपक्रमांची रूपरेषा ठरवली जाणार आहे. मंडळाचे सरचिटणीस यांनी मुरबाड तालुक्यातील कुणबी समाजाचे सर्व सभासद यांना महत्त्वपूर्ण सभेसाठी उपस्थित राहण्याचे अधिकृत निमंत्रण पाठवले आहे.
सभेपुढील मुख्य अजेंडा खालीलप्रमाणे आहे:
• मागील सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देणे.
• आर्थिक वर्ष २०२५-२०२६ चा जमा-खर्च आणि ताळेबंद पत्रक मंजूर करणे.
• आगामी आर्थिक वर्ष २०२६-२०२७ च्या अंदाजपत्रकावर शिक्कामोर्तब करणे.
• नवीन कालखंडासाठी अंतर्गत लेखापरीक्षक (Internal Auditor) आणि सनदी लेखापाल (CA) यांची नियुक्ती करणे.
• विविध सामाजिक आणि रचनात्मक उपक्रम राबवण्याबाबत सविस्तर चर्चा करणे.
• अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या इतर महत्त्वाच्या विषयांवर विचारविनिमय करणे.
मंडळाचे भविष्य आणि समाजहिताचे विविध निर्णय घेण्यासाठी तालुक्यातील सर्व कुणबी समाज सभासदांनी या सभेला वेळेवर उपस्थित राहून आपले अमूल्य योगदान द्यावे, असे आग्रहाचे आवाहन मंडळाच्या व्यवस्थापन समितीने केले आहे.
📲Get App