🔥 TRENDING ‘Muddhu Sose’ Artists Visit Annapoorne... Yuvraj Singh calls out truth in Cristi... KL Rahul stars in new ‘Ro-Co’ comedy a... ગણદેવી તાલુકા અનાવિલ મંડળ દ્વારા નવરાત... ખંભાળિયામાં રખડતા ઢોરનો ત્રાસ: વાહનચાલ... લિંબાયત પોલીસે ૩૫ પેટી અંગ્રેજી દારૂ સ...
09 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

काळू धरणाचा संघर्ष पोहोचला शिगेला: शिवसेना नेते संजय राऊत यांचा धरणग्रस्तांच्या संघर्षाला पाठिंबा.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 09 Oct 2026, 07:23 PM 👁 16
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड ठाणे.
दिनांक १०/१०/२०२६
विशेष बातमी :काळू धरणाचा संघर्ष पोहोचला शिगेला: शिवसेना नेते संजय राऊत यांचा धरणग्रस्तांच्या संघर्षाला पाठिंबा
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात नियोजित असलेले आणि मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने MMRDA मार्फत प्रस्तावित असलेल्या काळू धरणाचा संघर्ष आता तीव्र झाला आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
• संजय राऊत यांची भेट: शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना मुरबाड येथील काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्था, काळू व शाई धरण तसेच भोराडे प्रकल्पातील बाधितांची आणि शेतकरी प्रतिनिधींची भेट घेतली.
• अदानी प्रकल्पाला विरोध: या वेळी केंद्र सरकारच्या लाडक्या उद्योगसमूहाच्या प्रस्तावित "माळशेज-भोराडे अदानी प्रकल्प" विरुद्ध सभागृहात आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच फडणवीस सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी नागरिकांनी दर्शवली आहे.
• ** आंदोलनाचा इशारा:** आगामी काळात काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्था व शाई धरण संघर्ष समिती संयुक्तपणे आंदोलन करणार असून, प्रशासनाला जाब विचारला जाईल असा कडक इशारा संस्थेचे उपाध्यक्ष सय्यद शेख यांनी दिला आहे.
• नेत्यांचे आश्वासन: खासदार संजय राऊत यांनी धरणग्रस्तांच्या पाठीशी प्रत्येक प्रसंगी ठामपणे उभे राहण्याचे आणि संघर्षात पूर्ण साथ देण्याचे आश्वासन दिले आहे.
या प्रसंगी कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील विविध शेतकरी समन्वय समितीचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📲Get App