🔥 TRENDING Polish Surgeon Saves Police Officer Af... Balakrishna's 'Dada' team sets date fo... ‘Scene’ records third‑day box‑office e... Karnataka CM Shivakumar urges Tamil Na... Central Railway Gets Modified Automati... West Bengal CM Suvendu Adhikari apolog...
08 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Education

जि.प. शाळा सैताणेच्या विद्यार्थ्यांनी घेतली जिल्हा परिषद नंदुरबार कार्यालयाची सदिच्छा भेट;

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 08 Nov 2026, 08:34 PM 👁 50
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

जि.प. शाळा सैताणेच्या विद्यार्थ्यांनी घेतली जिल्हा परिषद नंदुरबार कार्यालयाची सदिच्छा भेट;

जि.प. शाळा सैताणेच्या विद्यार्थ्यांनी घेतली जिल्हा परिषद नंदुरबार कार्यालयाची सदिच्छा भेट; मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याशी साधला संवाद!
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजाची प्रत्यक्ष ओळख व्हावी आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयी गोडी व प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा, सैताणे (ता. जि. नंदुरबार) येथील शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालय, नंदुरबार येथे एक दिवसीय शैक्षणिक सदिच्छा भेट दिली.
या अभ्यासपूर्ण भेटी दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक गुलाब लोटन पाटील व प्राथमिक शिक्षक सुरेश च. बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद मुख्यालयांतर्गत असलेले विविध प्रशासकीय विभाग तसेच जिल्हा परिषद नंदुरबारच्या सभागृहास भेट देऊन ओळख करून घेतली.
या भेटीचा मुख्य आकर्षण बिंदू म्हणजे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल(भाप्रसे) यांच्या दालनास दिलेली भेट ठरली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी अत्यंत आपुलकीने व मनमोकळ्या वातावरणात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्याशी संवाद साधत असताना विद्यार्थ्यांनीही मा. नमन गोयल(भाप्रसे) यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्साहाने व अचूक उत्तरे दिली.
विद्यार्थ्यांना मिळाले मोलाचे जीवनविषयक मार्गदर्शन:
या संवादादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी व उत्तम नागरिक बनण्यासाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला:
• शालेय जीवनात आणि दैनंदिन व्यवहारात जोपासायच्या चांगल्या सवयी व मूल्ये.
• उत्तम वर्तन, अनुशासन व शिस्तीचे महत्त्व.
• शारीरिक व मानसिक विकासासाठी पौष्टिक आहाराचे सेवन.
• नियमित वाचन व अभ्यासाची योग्य सवय.
• आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करताना मोबाईलचा अतिवापर टाळणे.
वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून मिळालेल्या या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडलीच, शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास व आनंद पाहावयास मिळाला. या आगळ्या-वेगळ्या शैक्षणिक भेटीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग आणि ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले
📲Get App