🔥 TRENDING राष्ट्र भारतीय बसव दल के औरद तालुका अध... तृतीय चरण में आठ पंचायत समिति क्षेत्रो... ਚੋਣਾਂ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਗਠਜੋੜ 'ਤੇ ਸਸਪੈਂਸ, ਸੁਖ... मथुरा - यमुना एक्सप्रेसवे पर हादसा दो... Jailer 2 Tops Kerala Box Office for Th... ਮੁਲਾਜ਼ਮਾਂ ਨੂੰ ਦੀਵਾਲੀ ਦਾ ਵੱਡਾ ਤੋਹਫ਼ਾ, ਫ...
02 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

जुन्या वादातून डंपर अंगावर घालून खून; नगावच्या शरद पाटील यांचा मृत्यू, चौघांविरुद्ध गुन्हा...!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 02 Nov 2026, 04:52 PM 👁 8
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

अमळनेर : जुना वाद मनात धरून संगनमताने डंपर अंगावर घातल्याने नगाव येथील शरद रतन पाटील (वय ५२) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांद्री बसस्थानकाजवळ ३१ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी अमळनेर पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

विपुल किरण गोसावी, मयूर अनिल बोरसे, सागर संजय गोसावी आणि भरत सुभाष पाटील (सर्व रा. नगाव) अशी आरोपींची नावे आहेत. ज्ञानेश्वर काळुगीर गोसावी (वय ५२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, २८ ऑक्टोबर रोजी वाळूचे ट्रॅक्टर मागे घेताना धक्का लागल्याच्या कारणावरून विपुल गोसावी, सागर गोसावी आणि मयूर बोरसे यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला मारहाण केली होती. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या घटनेचे साक्षीदार असलेल्या शरद पाटील यांना दुसऱ्या दिवशी विपुल गोसावीने रस्त्यावर भेटल्यास चिरडून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत आहे.

३१ ऑक्टोबर रोजी नगाव खुर्दचे पोलीस पाटील प्रवीण गोसावी यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी फिर्यादीसह शरद पाटील व अन्य ग्रामस्थ देव हॉटेलकडे जात होते. रात्री ९.४५ वाजता नांद्री बसस्थानकाजवळ पाण्याची बाटली घेण्यासाठी ते थांबले होते. त्यावेळी पातोंड्याकडून आलेल्या राखाडी रंगाच्या मारुती कारमधून विपुल गोसावी, मयूर बोरसे व सागर गोसावी उतरले. त्यांच्या पाठोपाठ एचआर-३७-डी-८९५७ क्रमांकाचा डंपरही तेथे आला. डंपर चालक भरत पाटील याने ग्रामस्थांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या वेळी झालेल्या वादात विपुल गोसावीने डंपर चालकाला ग्रामस्थांना उडवून देण्यास सांगितले, तर मयूर बोरसे व सागर गोसावी यांनीही त्याला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर चालकाने डंपर वेगाने ग्रामस्थांच्या दिशेने नेला. विपुल गोसावी व मयूर बोरसे यांनी शरद पाटील यांना डंपरसमोर ढकलले, तर सागर गोसावी याने चंद्रशेखर पाटील यांनाही ढकलण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

डंपर शरद पाटील यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर चौघेही कार व डंपरसह अमळनेरच्या दिशेने पसार झाले. जखमी शरद पाटील यांना १०८ रुग्णवाहिकेने अमळनेर येथील नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुरनं. ५६२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), १०९, ३५१(२), ३५२ व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत आहेत.
📲Get App