Local
जानराववाडीतील झेडपी शाळेतील आरओ प्लांट बंद; विद्यार्थ्यांना दूषित पाणी, शिवसेना नेत्यांचा तीव्र संताप
जानराववाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आरओ प्लांट तीन महिन्यांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. या प्रकरणात प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर शिवसेना नेते रामकृष्ण बिसरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जानराववाडी (प्रतिनिधी) : स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बंद पडलेल्या 'आरओ प्लांट'च्या दुरुस्तीसाठी शिवसेनेचे नेते श्री. रामकृष्ण बिसरे गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, जानराववाडी ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीच्या या बेजबाबदार कारभारामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून त्यांच्या आरोग्याशी थेट धोका निर्माण झाला आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी नेते बिसरे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली होती. प्रत्यक्ष भेटी घेऊन तोंडी व लेखी स्वरूपात समस्येची जाणीव करून दिली होती. मात्र, तीन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही ग्रामपंचायतीने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. लाखो रुपये खर्च करून बसवलेला आरओ प्लांट केवळ देखभालीअभावी धूळ खात पडून आहे. उन्हाळा व बदलत्या हवामानात शुद्ध पाणी न मिळाल्यास लहान मुलांना जलजन्य आजार व पोटाचे विकार होण्याची तीव्र शक्यता आहे.
"शाळेतील लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. मी गेल्या तीन महिन्यांपासून ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवत आहे, परंतु प्रशासन डोळ्यांवर व झापडे बांधून बसले आहे. चिमुकल्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जर प्रशासनाला गांभीर्य नसेल, तर हे प्रशासन चालवायचे कोणासाठी? जर एकही विद्यार्थी आजारी पडला, तर त्यास सर्वस्वी ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील," असा सज्जड इशारा नेते बिसरे यांनी दिला आहे.
प्रशासनाने तात्काळ आरओ प्लांटची दुरुस्ती करून पाण्याचा पुरवठा सुरू करावा, अन्यथा शिवसेना, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयावर तीव्र मोर्चा काढून कार्यालयाला टाळे ठोकले जाईल, असा इशारा संतप्त पालकांनी दिला आहे. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.