🔥 ट्रेंडिंग mathura vrindavan मथुरा में दीपावली से... हिमालय में भारी बर्फबारी से लैंडस्लाइड... बुलंदशहर में कार‑पेड़ टकराव में पांच म... 2027 के चुनाव से पहले उत्तर प्रदेश के... परविंदर सिंह झोटा की हत्या में पत्नी क... अमृतसर में कैमरामैन की धक्कामुक्की पर...
17 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
जामनेर-बोदवड मार्गावरील जुगार अड्डा पोलिसांनी केला उद्ध्वस्त; ५ जण ताब्यात.....

जामनेर-बोदवड मार्गावरील जुगार अड्डा पोलिसांनी केला उद्ध्वस्त; ५ जण ताब्यात.....

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 17 अक्टू. 2026, 11:58 AM 👁 18
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई

जामनेरमध्ये अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई; पाच जणांवर गुन्हा दाखल

जामनेर, दि. १६ - जामनेर शहरातील जामनेर-बोदवड रस्त्यालगत असलेल्या नॅशनल ढाब्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या अवैध पत्ता जुगारावर जामनेर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि ८ हजार १५० रुपये रोख रक्कम जप्त करत पाच जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.२० वाजेच्या सुमारास नॅशनल ढाब्यामागील मैदानात काही इसम पैशांची बाजी लावून पत्त्यावर जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत छापा मारला.

या कारवाईत सय्यद आरिफ सय्यद रशीद (वय ४०, रा. जुना बोदवड रोड), शेख जुबेर शेख गुलाम नबी कुरेशी (वय २६, रा. मदनी नगर), शेख अहमद शेख शकील (वय ३८, रा. घोडेपीर नगर), जाबिर मोती शेख (वय ३८, रा. मदनी नगर) आणि अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. सर्व आरोपी जामनेर येथील रहिवासी आहेत.

छाप्यात आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम व जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्त्यांचे कॅट जप्त करण्यात आले असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ८,१५० रुपये आहे.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी मनोज जरीर तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. ताज्या कारवाईमुळे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बाळू भोई, सचिन महाजन, योगेश पाटील, मनोज तडवी आणि गजानन माळी यांच्या पथकाने केली.
📲Get App