🔥 TRENDING अशोकनगर: ग्राम बरौदिया धना में श्रीमद्... રાજકોટમાં સળગતી ઈંઢોળી સાથે ગરબાની પ્ર... कोडरमा लोकसभा क्षेत्र में शिक्षकों की... મહેસાણા જિલ્લામાં-: પોલીસ અધિક્ષક હિમા... કચ્છના દરિયાકાંઠે મરીન કમાન્ડો દ્વારા... पलिया नशा मुक्ति केंद्र में मरीज नशा क...
01 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

जळगावात कॉफी शॉपच्या नावाखाली संशयास्पद प्रकार ; 'Heaven Cafe' वर दामिनी पथकाची धाड.....!!

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 01 Oct 2026, 09:05 PM 👁 8
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जळगाव - शहरातील एम.जे. कॉलेज परिसरात असलेल्या गजानन चेंबरमधील 'हेवन कॅफे'वर दामिनी पथकाने मंगळवारी, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी धाड टाकली. कॉफी शॉपच्या नावाखाली अनधिकृतपणे लाकडी कपार्टमेंट उभारून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कॅफे चालक विजय राजेंद्र पाटील (वय २९, रा. इंद्रानगर, खेडी, जि. जळगाव) याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचारी सुनिता तुकाराम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गजानन चेंबरमधील 'हेवन कॅफे'मध्ये गाळ्याच्या आत लाकडी कपार्टमेंट तयार करून पडदे लावल्याची आणि तेथे अंधाराची व्यवस्था करून विद्यार्थी-विद्यार्थिनींना बसू दिले जात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पंचांसह पथकाने सदर ठिकाणी पाहणी केली.

पाहणीदरम्यान कॅफेमध्ये प्लायवुड, बोर्ड आणि पार्टिकलच्या सहाय्याने वेगवेगळी कपार्टमेंट तयार करण्यात आल्याचे दिसून आले. प्रत्येक कपार्टमेंटला पडदे लावलेले होते. त्या ठिकाणी काही जण आक्षेपार्ह वर्तन करत असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी चालक विजय पाटील याच्याकडे चौकशी केली असता, कॅफे चालवण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही परवाना त्याच्याकडे नव्हता. तसेच प्रत्यक्षात कॉफी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य - कॉफी पावडर, साखर, गॅस शेगडी आदी कोणतीही व्यवस्था तेथे आढळून आली नाही. केवळ बाहेर कॉफी शॉपचा फलक लावून आतमध्ये खासगी केबिन तयार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सदर कारवाई ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.१० वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९ व १३१(३) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे महाविद्यालय परिसरातील कॅफेंच्या सुरक्षेचा आणि नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या अशा आस्थापनांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
📲Get App