🔥 TRENDING State Inspection Finds 178 Officials A... दाऊजी महाराज की शोभायात्रा में उमड़ा ज... Indian Star Set to Lead US Crime Thril... Air India Suspends Riyadh Flights Unti... Rahul Demands CEC Gyanesh Kumar Resign... UK Announces £1 Billion in New Commerc...
13 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; शाळकरी विद्यार्थ्यांचे वाहन पलटी, १० जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक....!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 13 Oct 2026, 08:06 AM 👁 10
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जळगाव - जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा फाट्याजवळ शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे छोटा हत्ती वाहन पलटी झाल्याची गंभीर घटना घडली. या अपघातात ८ ते १० विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर इयत्ता आठवी, नववी आणि दहावीचे विद्यार्थी बसची वाट पाहत थांबले होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका खासगी छोटा हत्ती वाहनाला हात दाखवून विद्यार्थी कंडारी येथे जाण्यासाठी त्यात बसले. मात्र, काही अंतरावरच सदर वाहनाचा अपघात होऊन ते पलटी झाले. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले.

अपघातानंतर सर्व जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून, एका विद्यार्थ्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी असलेल्या काही विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघाताची बातमी समजताच पालकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. आपल्या पाल्याच्या प्रकृतीची चिंता असल्याने अनेक महिला पालकांना अश्रू अनावर झाले होते.

दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बबन आव्हाड यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
📲Get App